घरमहाराष्ट्रमहिलांनी पार्श्वभागात लपवून आणले २०० तोळे सोने

महिलांनी पार्श्वभागात लपवून आणले २०० तोळे सोने

Subscribe

संजय दत्त याचा वास्तव चित्रपट बहुतेकांनी पाहिला असेल. त्यामध्ये रघुच्या (संजयच्या) तोंडी एक डायलॉग आहे. ‘पच्चास तोला पच्चास तोला, कितना? पच्चास तोला!’ डायलॉग लोकांच्या चांगलाच लक्षात राहिला आहे. परंतु पुण्यात रघुला मात देतील अशा चार महिलांना पुणे कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले आहे. या चार महिला प्रत्येकी ५० तोळे सोन्याची तस्करी करत होत्या. आज पुणे विमातळावर स्पायसजेटच्या एसजी ५२ या विमानाने ते पुणे विमानतळावर उतरल्या. कस्टम अधिकाऱ्यांनी या महिलांना पकडल्यानंतर त्यांच्याकडील २ किलो सोने जप्त केले आहे. २४ कॅरेट दर्जाचे तब्बल २ हजार ३६ ग्रॅम म्हणजेच २०३ तोळे सोने पकडण्यात आले आहे. या महिलांनी २०० तोळे सोने शरीरात लपवून आणले होते. या महिलांनी त्यांच्या पार्श्वभागात सगळे सोने लपवले होते. पुणे विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांच्या नजरेतून ही गोष्ट चुकली नाही.

शरीरात लपवलेले २ किलो सोने

याआधी सोन्याची तस्करी करणाऱ्या पुरूष तस्करांना पकडण्यात आले आहे. परंतु सोने तस्करी करण्याच्या गुन्ह्यात पहिल्यांदाच महिलांना पकडले आहे. या महिलांनी इतक्या वजनाचे सोने त्यांच्या शरीरात लपवले होते. महिला त्यांच्या शरीरात सोने सहज लपवू शकतात असा अंदाज बांधून या कामासाठी महिलांचा वापर केला जात असल्याचे मत अनेकांनी मांडले आहे. या चारही महिला सुदान येथील असल्याचे कस्टम विभागाचे डेप्युटी कमिशनर के. आर. रामाराव यांनी सांगितले. या महिलांकडील सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -