घरक्रीडाविराट आता कर्णधार म्हणून परिपक्व झाला आहे!

विराट आता कर्णधार म्हणून परिपक्व झाला आहे!

Subscribe

 कपिल देवचे मत

भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वावर मागील काही काळात बरीच चर्चा झाला आहे. आयपीएलमध्ये विराटला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार म्हणून फारसे यश मिळालेले नाही. त्यातच भारतीय संघात खेळताना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्याला वारंवार मार्गदर्शन करताना दिसतो. त्यामुळे धोनी सोबत असेल तरच विराट यशस्वी होऊ शकतो असे अनेकांना वाटते. मात्र, विराट आता कर्णधार म्हणून परिपक्व झाला असून त्याच्या नेतृत्त्वात भारत विश्वचषक जिंकू शकेल, असे १९८३ विश्वचषक जिंकणार्‍या भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव यांना वाटते.

मला हे नक्कीच बोलावेसे वाटते की, धोनीकडून कर्णधारपद मिळाल्यापासून ते आतापर्यंत विराट खूप परिपक्व झाला आहे. विराटच्या आक्रमकपणामुळे त्याच्यावर याआधी बरीच टीका झाली आहे. मात्र, त्याच्या 30मुळेच तो इतका उत्कृष्ट खेळाडू झाला आहे. त्याचे वागणे काही लोकांना अगदी बालिशही वाटले असेल. मात्र, त्याने जिद्दीने आणि स्वतःला आव्हान देऊन आपला खेळ एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे यात शंका नाही. चार वर्षांपूर्वी विराट अगदी त्या क्षणी जे वाटेल, ते करायचा. मात्र, तो आता खूप शांत आणि संयमी झाला आहे. तिसर्‍या पंचांकडे जेव्हा रिव्ह्यू मागायची वेळ येते, तेव्हा तुम्ही पाहू शकता की तो आता आपल्या संघातील इतर खेळाडूंचा सल्ला घेऊनच काय तो निर्णय घेतो. यावरूनच तो कर्णधार म्हणून किती परिपक्व झाला आहे, हे कळते, असे मत कपिल यांनी आपले नवे पुस्तक ’वर्ल्डकप वॉरियर्स’ यामध्ये व्यक्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -