घरक्रीडाअयशस्वी संघांची विजयाची कहानी; ऑस्ट्रेलियाला धूळ चारत इंग्लंड फायनलमध्ये

अयशस्वी संघांची विजयाची कहानी; ऑस्ट्रेलियाला धूळ चारत इंग्लंड फायनलमध्ये

Subscribe

विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा ८ विकेट्सनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडने फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे आता फायनलमध्ये न्यूझीलंडच्या विरोधात इंग्लंड खेळणार आहे.

इंग्लंड आमि न्यूझीलंड या दोन्ही संघांना आतापर्यंत एकदाही विश्वचषक सामन्यात जेतेपद पटकावता आलेले नाही. मात्र, यावेळी दोन्ही संघांनी जय-पराजयच्या सीमा ओलांडत फायनलमध्ये धडक मारली आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघांनी जगातील मातब्बर संघांचा पराभव केला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात दोन्ही संघांचे कौतुक होत आहे. आता दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली तर कोण कुणावर बाजी मारेल आणि जगज्जेत्ता ठरेल, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इंग्लंडने ८ गडी राखत ऑस्ट्रेलियाचा उडवला धुव्वा

ऑस्ट्रेलियाचा संघ अत्यंच ताकदवार संघ मानला जातो. मात्र, यावेळी सोमीफायनलमध्ये इंग्लंडसमोर ऑस्ट्रेलियाची पळता भुई थोडी झाली. कारण इंग्लंडच्या गोलंदाजांच्या माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांमध्ये फक्त स्टिव्ह स्मिथ आणि अॅलेक्स कॅरी यांनी परिस्थितीनुसार मुल्यनीय कामगिरी करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २२३ पर्यंत पोहोचवली. या आव्हानाला इंग्लंडने सहज पूर्ण केले. सलामीवीर जेसन रॉयने ६५ चेंडूत ८५ धावा केल्या. तर जॉनी बेयरस्टो ३४ धावा करुन पायचित पडला. त्यानंतर रुट आमि मॉर्गन यांनी डाव सावरत सामना खिशात घातला. त्यामुळे इंग्लंडचा ८ विकेट्सनी विजय झाला.

- Advertisement -

न्यूझीलंडने भारताला नमवले

न्यूझीलंड संघाने या विश्वचषक स्पर्धेत बऱ्यापैकी कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव करुन न्यूझीलंड फायनलमध्ये प्रवेश मिळवला. विश्वचषकच्या या मोसमात भारतीय संघ सर्वात शक्तिशाली संघ होता. भारताने इंग्लंड विरुद्धचा सामना वगळला सर्व सामने जिंकले होते. त्यामुळे न्यूझीलंड पुढे मोठे आव्हान होते. मात्र, न्यूझीलंडने शक्कल लढवत भारतीय संघाला नमवले आणि सामना जिंकून दाखवला.


हेही वाचा – वर्ल्डकप २०११चा हिरो धोनी, आताच्या पराभवाचा व्हिलन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -