घरक्रीडाविनेशसमोर सोफियाचे आव्हान!

विनेशसमोर सोफियाचे आव्हान!

Subscribe

जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा

जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत आघाडीची खेळाडू विनेश फोगटकडून भारताला पदकाची आशा आहे. मात्र, तिला हे पदक मिळवण्यासाठी बरीच मेहनत करावी लागणार आहे. याचे कारण ५३ किलो वजनी गटाच्या पहिल्याच फेरीत विनेशचा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सोफिया मॅटसनचे आव्हान असणार आहे. विनेशने जागतिक स्पर्धेत सहा पदके मिळवणार्‍या सोफियाला मागील महिन्यात झालेल्या पोलंड ओपनमध्ये पराभूत केले होते. परंतु, जागतिक स्पर्धेत सोफियाचा पराभव करणे विनेशला सोपे जाणार नाही. ५५ किलो वजनी गटात सोफिया ही जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी आहे. ऑलिम्पिकमध्ये या वजनी गटाचा समावेश नाही.

५३ किलो वजनी गटाच्या जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असणार्‍या विनेशला सोफियाचा पराभव करण्यात यश आल्यास तिचा पुढील फेरीत जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानी (५५ किलो) असणार्‍या आणि गतविजेत्या मायू मुकाईदाशी सामना होण्याची शक्यता आहे. हा सामनाही विनेशने जिंकल्यास उपांत्यपूर्व फेरीत तिच्यासमोर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणार्‍या अ‍ॅन हिल्डेब्रँडचे आव्हान असू शकेल.

- Advertisement -

विनेशला आव्हानात्मक सामने खेळावे लागणार असले, तरी तिचे प्रशिक्षक वॉलर अकॉस यांना याची फारशी चिंता नाही. विश्व विजेता बनण्यासाठी तुम्हाला सर्वोत्तम खेळाडूंचा पराभव करावाच लागतो. मग घाबरायचे कशाला?, असे अकॉस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -