घरटेक-वेकबॉशने आणले कॉर्डलेस पॉवर टूल्स

बॉशने आणले कॉर्डलेस पॉवर टूल्स

Subscribe

बॉश पॉवर टूल्स इंडिया या बांधकाम, लाकूडकाम आणि धातूकाम उद्योगांसाठी पॉवर टूल्स या कंपनीने आता कॉर्डलेस पॉवर टूल्स श्रेणी भारतात आणली आहे. या उद्योगातील एक क्रांती असलेली पॉवर टूल्सची कॉर्डलेस श्रेणी कारागीर आणि ब्लू कॉलर कामगारांना वायर किंवा केबल्सच्या अडथळ्यांशिवाय आणि कार्यक्षमता, शक्ती यांच्यावर तडजोड न करता काम करण्याची संधी देते. तसेच सुरक्षा तसेच उत्तम अर्गोनॉमिक्सचे अतिरिक्त फायदे देते. लिथियम आयर्न बॅटरी असलेला स्क्रू ड्रायव्हर, बॉश गो त्याच्या पुश अँड गो कार्यक्षमतेसह असून अस्तित्वातील स्क्रूड्रायव्हर्सच्या तुलनेत चार पट अधिक सोयीचा आणि बॉशच्या कॉर्डलेसमधील नावीन्यपूर्ण उत्पादनांपैकी एक आहे. या श्रेणीत कॉर्डलेस पॉवर ड्रिल ड्रायव्हर्स, हाय पॉवर इम्पॅक्ट रेंचेस, मजबूत हॅमर ड्रिल्स, उच्च कामगिरी इम्पॅक्ट ड्रिल्स, एबीआरयुक्त इम्पॅक्ट ड्रायव्हर्स आणि लवचिक ड्रिल ड्रायव्हर्स तसेच इतर अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. या टूल्सची रचना एका मॅन्युअल डिझाइनचा आकार तसेच रचनेच्या जवळपास जाणारी आहे, जेणेकरून भारतीय वापरकर्त्यांना कमीत-कमी थकवा येईल आणि त्यांना मानवी प्रयत्नांपासून कोणत्याही प्रयत्नांशिवाय काम करता येईल.

या निमित्ताने बोलताना पनिश पीके, प्रादेशिक व्यवसाय संचालक, भारत आणि सार्क- बॉश पॉवर टूल्स म्हणाले की, ‘‘कॉर्डमुळे कामाच्या जागेवर मर्यादा येतात आणि वायरची लांबी कमी झाल्यामुळे तसेच विद्युत प्लगपर्यंत पोहोचण्याची क्षमता कमी होऊन अडथळे निर्माण होतात. बॉश पॉवर टूल्सच्या विविध प्रकारच्या कॉर्डलेस उत्पादनांच्या श्रेणीमागील कल्पना म्हणजे कामगार आणि कारागिरांना भेडसावणार्‍या वायर साधनांच्या गैरसोयी आणि अडथळा कमी करणे ही होय. बॉश मतलब कॉर्डलेस मोहिमेद्वारे बॉश पॉवर टूल्सचे उद्दिष्ट देशभरातील आपल्या उदरनिर्वाहासाठी पॉवर टूल्सवर अवलंबून असलेल्या कारागिरांचे आयुष्य बदलण्याचे आहे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -