घरटेक-वेकHonor Smart TV नवीन टेक्नॉलॉजी आणि वेगळ्या फिचर्ससह लॉन्च!

Honor Smart TV नवीन टेक्नॉलॉजी आणि वेगळ्या फिचर्ससह लॉन्च!

Subscribe

कंपनीने चीनी माइक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Weibo वर याविषयी माहिती शेअर केली आहे.

स्मार्टफोन आणि स्मार्ट डिवाईज बनवणारी चीनी कंपनी हुवाई (Huawei) चा सब ब्रॉण्ड हॉनरने मागच्या आठवड्यात भारतात हॉनर 9Xpro हा स्मार्टफोन लॉन्च केला. तर कंपनीने आज म्हणेज १८ मेला अनेक स्मार्ट प्रोडक्ट लॉन्च करणार आहे. त्याचबरोबर २० मे ला चीनमध्ये HonorX10 5G हा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. १८ मेला ही कंपनी हॉनर स्मार्ट टिव्हीचे पुढीचे मॉडेल आणणार आहे. या स्मार्ट टिव्हीमध्ये ६ माईक आणि एसीएम टेक्नॉलॉजी बसवण्यात आली आहे.

कंपनीने चीनी माइक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Weibo वर याविषयी माहिती शेअर केली आहे. Honor Smart TV 2020 मध्ये MEMC (Motion Estimation / Motion Compensation) टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. या टेक्नॉलॉजी मुख्यकरून हाई एंडच्या प्रिमीयम स्टार्ट टिव्हीमध्ये वापर करण्यात येतो. या स्मार्ट टिव्हीला ६५ इंच स्क्रीन लावण्यात येणार आहे. MEMC हे टेक्नीक या टिव्हीत वापरल्यामुळे टिव्हीत व्हिडिओलामध्ये अधिक क्लॅरिटी मिळते. या टेक्नॉलॉजीला स्मूदिंग टेक्नॉलॉजी असेही म्हणतात.

- Advertisement -

या टिव्हित ACM टेक्नॉलिजीचाही वापर करण्यात आला आहे. यामुळे टीव्हीवर सुरू होणार्‍या व्हिडिओचा रंग आपोआप दुरुस्त केला जाऊ शकतो. त्याच वेळी, त्यामध्ये वापरल्या जाणार्‍या एसआर (सुपर रेझोल्यूशन) याद्वारे, कमी गुणवत्तेची सामग्री देखील चांगल्या क्वालिटी रिअल टाइममध्ये पाहिली जाऊ शकते. त्याचबरोबर या टिव्हीला ६ माईक देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकाला चांगली साऊंड क्वालिटी मिळणार आहे.


हे ही वाचा – आफ्रिदी म्हणतो बायोपिकमध्ये आमिर, टॉम क्रूझने काम करावं; नेटकरी म्हणतात, ‘पाकिस्तान विकावा लागेल’!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -