घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतली

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता विधानपरिषदेचे सदस्य बनले आहेत. आज त्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. मुंबईत विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी सोहळा पार पडला. उद्धव ठाकरे यांच्यासहीत आठ सदस्यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. या सदस्यांनीही आज आमदारकीची शपथ घेतली. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सर्व सदस्यांना शपथ दिली.

उद्धव ठाकरे यांची सहा महिन्यांची मुदत २८ मे रोजी संपत होती. मात्र त्याच्या दहा दिवसाआधीच राज्यातील सरकार अस्थिर होण्याचे संकट टळले आहे. विधानपरिषदेच्या २४ एप्रिल रोजी रिक्त झालेल्या ९ जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. ९ जागांसाठी १३ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. मात्र १४ मे रोजी ४ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली.

- Advertisement -

विधीमंडळात अतिशय साधेपणाने अगदी १० मिनिटांत शपथविधीचे सोपस्कर पार पडले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -