घरटेक-वेकRedmi Go स्मार्टफोन पेक्षा Nokia 1 स्वस्त !

Redmi Go स्मार्टफोन पेक्षा Nokia 1 स्वस्त !

Subscribe

आतापर्यंत Redmi Go हा सर्वांत स्वस्त किंमतीचा स्मार्टफोन होता, मात्र आता Nokia कंपनीने Nokia 1 च्या किंमत कमी करून ग्राहकांना आकर्षित केले आहे.

गेल्या वर्षी भारताने Nokia 1 हा स्मार्टफोन ५ हजार ४९९ रूपयांत लॉंच केला. Xaiomi ने नुकताच Android Go वर आधारित Redmi Go स्मार्टफोन लॉंच केला आहे. म्हणून, Nokia 1 Xaiomiच्या Redmi Go स्मार्टफोनला स्पर्धा देण्यासाठी Nokia कंपनीने Nokia 1 ची किंमत कमी केली आहे. सध्या भारतात या फोनची किंमत ३ हजार ९९९ रूपयात उपलब्ध झाला आहे.

भारतात Xaiomi चा Redmi Go स्मार्टफोन मागील महिन्यात लॉंच झाला आहे. या दोन्ही कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये जोरदार स्पर्धा होत आहे. कारण आतापर्यंत Redmi Go हा सर्वांत स्वस्त किंमतीचा स्मार्टफोन होता, मात्र आता Nokia कंपनीने Nokia 1 च्या किंमत कमी करून ग्राहकांना आकर्षित केले आहे.

- Advertisement -

Nokia 1 च्या स्मार्टफोनचे फीचर्स

  • या फोनला ४.५ इंच असणारा डिस्प्ले देण्यात आला असून, या फोन मध्ये 1GB रॅम देखील आहे.
  • इंटरनल मेमरी 8GB असून मायक्रो एसडी कार्डच्या सहाय्याने 128GB वाढवता येईल.
  • या फोनमध्ये 1.1GHz क्वॉड कोर MediaTek MT6737M प्रॉसेसर देण्यात आला आहे.
  • फोटोग्राफीकरिता ५ मेगापिक्सल कॅमेरा तर २ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
  • या फोनची बॅटरी 2,150 mAh एवढी आहे.

Redmi Go च्या स्मार्टफोनचे फीचर्स

  • या फोनला ५ इंच असणारा डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • या फोनमध्ये Qualcomm Snapdragon ४२५ प्रॉसेसर देण्यात आले आहे.
  • या फोन मध्ये 1GB रॅम देखील आहे. इंटरनल मेमरी 8GB असून मायक्रो एसडी कार्डच्या सहाय्याने वाढवता येईल.
  • या फोनची बॅटरी 3,000mAh एवढी आहे.
  • Nokia 1 स्मार्टफोनच्या तुलनेत Redmi Go एक पाऊल पुढे आहे. त्यामुळे या दोन्ही फोनमध्ये चांगलीच स्पर्धा होऊ शकते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -