लवकरच Realme X7 सीरिज भारतात होणार लाँच

realme x7 series to be launched in india 2021
लवकरच Realme X7 सीरिज भारतात होणार लाँच

चीनची टेक कंपनी रिअलमीने सप्टेंबरमध्ये रिअलमी एक्स७ (Realme X7) सीरिज चीनमध्ये लाँच केला होता. आता कंपनी ही सीरिज पुढच्या वर्षी भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. याबाबतची माहिती कंपनीचे सीईओ माधव सेठ यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. पण अद्या या सीरिजची लाँच तारिख आणि किंमतीचा खुलासा झाला नाही आहे. माहितीनुसार रिअलमी पहिली अशी कंपनी आहे, ज्या कंपनीने भारतात पहिल्यांदा 5G स्मार्टफोन लाँच केला होता. या डिवाईजचे नाव रिअलमी एक्स५० प्रो (Realme X50 Pro) आहे.

रिअलमी इंडिया आणि युरोपचे सीईओ माधव सेठ यांनी असे ट्विट केले आहे की, आम्ही यावर्षी सर्वात पहिल्यांदा भारतात 5G स्मार्टफोन रिअलमी एक्स५० प्रो (Realme X50 Pro) लाँच केला होता. आता आम्ही रिअलमी एक्स७ (Realme X7) सीरिज पुढच्या वर्षी लाँच करण्याची योजना तयार करत आहोत.

Realme X7 आणि Realme X7 Proची किंमत

रिअलमी एक्स७ स्मार्टफोन 6GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये मिळेल. ज्याची किंमत अनुक्रमे १,७९९ चीनी युआन (सुमारे १९ हजार रुपये) आणि २,३९९ चीनी युआन (सुमारे २५ हजार ६०० रुपये) आहे. हा स्मार्टफोन Haiyu ब्लू, सी-कलर आणि Fantasy व्हाईट कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकता.

तर रिअलमी एक्स७ प्रो 6GB रॅम + 128GB स्टोरेज, 8GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंटसह बाजारात उपलब्ध आहे. यापूर्वी पहिल्या व्हेरिएंटची किंमत २,१९९ चीनी युआन (सुमारे २३ हजार ४०० रुपये) तर दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत २,४९९ चीनी युआन (सुमारे २६ हजार ६०० रुपये) आणि तिसऱ्या व्हेरिएंटची किंमत ३,१९९ चीनी युआन (सुमारे ३४ हजार ३०० रुपये) आहे.