चीनला आणखी एक धक्का; चायनीज टिव्ही फॅक्ट्री बंद करणार Samsung

नोव्हेंबर २०२० मध्ये, चीनमधील तियानजिन शहरात सॅमसंगचे टीव्ही प्रॉडक्शन युनिट बंद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

चीनला आणखी एक धक्का; चीनी टिव्ही फॅक्ट्री बंद करणार Samsung

दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने एक मोठे पाऊल उचलले असून चीनमध्ये असलेला आपला टीव्ही कारखाना बंद करण्याचा निर्णय सॅमसंगने घेतला आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये, चीनमधील तियानजिन शहरात सॅमसंगचे टीव्ही प्रॉडक्शन युनिट बंद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या अहवालानुसार या कारखान्यात सुमारे ३०० लोकं काम करतात आणि चीनमधील हा एकमेव सॅमसंग टीव्ही कारखाना आहे, जरी सॅमसंगने कामगारांच्या संख्येवर कोणतेही भाष्य केलेले नसले परंतु काही लोकांना नोकरी दिली जाईल हे निश्चितपणे कंपनीने म्हटले आहे.

यापूर्वी सॅमसंगने सूजौमधील घरागुती उपकरणाचा कारखाना आणि चीनमधील झियानमधील चिप उत्पादन कारखाना बंद केला. गेल्या महिन्यातच सॅमसंगने आपला चीनी संगणक कारखाना बंद करण्याची घोषणा केली आहे.यावरूनच असे लक्षात येते की, सॅमसंग हळूहळू आपला व्यवसाय चीनकडून काढून घेण्याच्या मार्गावर आहे. यावर्षी जूनमध्ये, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने त्याचे डिस्प्ले प्रोडक्शन चीनपासून व्हिएतनामकडे हलवल्याच्या बातम्या आल्या आहेत, मात्र अद्याप सॅमसंगने याबद्दल कोणतेही अधिकृत निवेदन दिले नाही.

तसेच सॅमसंग व्हिएतनामचा सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे. व्हिएतनाममध्ये सॅमसंगची एकूण १७ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे, ती सुमारे १.२९ लाख कोटी रुपये आहे. तैवानचे वृत्तपत्र Tuoi Tre यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे की, सॅमसंग व्हिएतनामला इतर आग्नेय आशियाई देशांमधील महत्त्वपूर्ण प्रवेशद्वार आणि त्याच्या जागतिक पुरवठा साखळीचा दुवा म्हणून पाहत असल्याचे यामध्ये सांगितले आहे.


एअर इंडियातून प्रवास करणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सूट