केवळ ५ हजारांच्या EMI वर खरेदी करता येणार टाटा कंपनीची ‘ही’ कार

New Delhi
tata tiago now offering at an emi of minimum rs 5000 know full details
केवळ ५ हजारांच्या EMI वर खरेदी करताना येणार टाटा 'ही' कार

लॉकडाऊननंतर टाटा मोटर्स कंपनीने एका नवीन फायनान्स पॅकजेची घोषणा केली. आहे. या पॅकजेचे नाव ‘Keys to Safety’असून ग्राहकांना पॅकजेमधून खूप मोठ्या कालावधीसाठी लोनसोबत स्वस्त ईएमआय यासारखी सुविधा मिळणार आहे. या पॅकजेमध्ये कोरोना वॉरियर्ससाठी स्पेशल ऑफर देखील दिली आहे. Tata Tiago कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या पॅकजेचा उपभोग घेता येणार आहे. या पॅकेज अंतर्गत Tata Tiago कार प्रति महिना ५ हजार ईएमआयवर खरेदी करता येणार आहे. सुरुवातील ६ महिने हा ईएमआय असणार आहे. तसंच ५ लाख रुपयांपर्यंत लोन असणार आहे. हे लोन फेडण्यासाठी जास्तीत जास्त ५ वर्षांचा कालावधी असणार आहे आणि हा ईएमआयची रक्कम ६ नंतर हळूहळू वाढत जाणार आहे.

Tata Tiago खरेदी केल्यानंतर…

ग्राहकांनी Tata Tiago खरेदी केल्यानंतर शेवटचा ईएमआय भरण्यासाठी तीन व्हॅल्यू अॅडिंग पर्याय निवडण्याची सुविधा दिली आहे.

१. ग्राहक एकदाच शेवटचा बुलेट ईएमआय भरून कारचे मालक बनू शकतो.

२. आर्थिक संकटाच्या परिस्थितीत ग्राहक फायनान्शियल पार्टनर टाटा मोटर्स फायनान्सला कार परत करू शकतो.

३. तसंच फायनल ईएमआयला पुन्हा फायनान्स करण्याचा पर्याय आहे.

कोरोना वॉरियर्स सारख्या व्यक्तींना टाटा मोटर्सने ४५ हजार रुपयांपर्यंत स्पेशल बेनिफिट्स दिले आहेत. टाटाच्या अल्ट्रॉज सोडून उतर कारवर ही ऑफर आहे.

Tata Tiago शिवाय इतर कार किंवा एसयूव्ही खरेदी करणाऱ्याला ग्राहकांला १०० टक्के ऑन रोड फायनान्स सुविधा दिली आहे. याशिवाय ८ वर्षांपर्यंत ग्राहकांना ईएमआय स्कीम सुविधा देऊ शकते. यामुळे महिन्याचा ईएमआय कमी होण्यास मदत होऊ शकते. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात टाटाने ऑलाईन विक्रीला सुरुवात केली आहे. कारची माहिती, टेस्टे ड्राइव्हसाठी विनंती, बुकिंग यांसारख्या सुविधा तुम्हाला ‘Click to drive’ मिळणार आहेत.


हेही वाचा – यामुळे टिकटॉकला बसला सर्वात मोठा फटका; रेटिंग स्टार ४.५ वरून १.३वर!