घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटफेसबुकवर लोड वाढला, पहिल्यांदाच ४५ हजार कर्मचारी वर्क फ्रॉम होम!

फेसबुकवर लोड वाढला, पहिल्यांदाच ४५ हजार कर्मचारी वर्क फ्रॉम होम!

Subscribe

करोना व्हायरसचा फैलाव होत असतानाच सर्वजण माहितीसाठी फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. या पार्श्वभूमीवर फेसबुकवरचा लोड वाढू लागला आहे.

जगभरात करोना व्हायरसचा फैलाव वेगाने होत असताना अनेक प्रकारच्या उद्योगधंद्यांना त्याचा फटका बसला आहे. पण या उद्योगांप्रमाणेच सोशल मीडिया वेबसाईट असलेल्या फेसबुकला देखील करोना व्हायरसचा मोठा फटका बसला आहे. गेल्या महिन्याभरात जगभर करोना व्हायरसचा फैलाव सुरू असून या पार्श्वभूमीवर माहिती मिळवण्यासाठी, माहिती देण्यासाठी, व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी, चॅटिंग करण्यासाठी, व्हिडिओ कॉलिंगसाठी किंवा मेसेज पाठवण्यासाठी फेसबुक किंवा फेसबुकच्या कंपन्या असलेल्या व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि मेसेंजरचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे त्याचा पूर्णपणे लोड फेसबुकच्या अल्गोरिदमवर आणि त्यांच्या तांत्रिक बाजूवर पडत आहे. विशेष म्हणजे, या काळात लोड वाढत असून देखील जाहिराती मात्र मोठ्या प्रमाणावर कमी झाल्यामुळे फेसबुकला आर्थिक नुकसान देखील सोसावं लागत आहे. न्यूयॉर्क टाईम्सने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

‘आम्ही फेसबुक सुरू ठेवण्याचा प्रयत्न करतोय’

अनेक देशांमध्ये इन्स्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजरवर मेसेज पाठवण्याचं प्रमाण तब्बल ५० टक्क्यांनी वाढलं आहे. तर करोनाचा सध्या सर्वाधित प्रभाव जाणवणाऱ्या इटलीमध्ये फेसबुकवरून होणाऱ्या ग्रुप कॉलिंगचं प्रमाण एक हजार टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलं आहे. फेसबुकवर पोस्ट होणाऱ्या करोनासंदर्भातल्या बातम्यांना युजर्स वारंवार क्लिक करून त्या वाचत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘आम्ही फेसबुक आणि संबंधित इतर प्लॅटफॉर्म्स सुरू ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत’, अशी प्रतिक्रिया मार्क झकरबर्गने एका मुलाखतीमध्ये दिली आहे.

- Advertisement -

४५ हजार कर्मचारी वर्क फ्रॉम होम!

असं म्हटलं जातं की फेसबुकमध्ये मॅन टू मॅन काम करण्याची पद्धत जास्त वापरली जाते. कारण त्यामुळेच त्यांचं काम प्रभावी होतं. यासाठीच आजपर्यंत फेसबुकने कधीही वर्क फ्रॉम होमचचा पर्याय स्वीकारला नव्हता. मात्र, करोनाच्या फैलावामुळे पहिल्यांदाच फेसबुकचे तब्बल ४५ हजार कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्याशिवाय, या कर्मचाऱ्यांना चुकीची माहिती किंवा पोस्ट काढून टाकण्याचं देखील मोठं काम या काळात करावं लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त ताण येत असल्याचं न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तात म्हटलं आहे.

आर्थिक संकट येऊ शकतं?

दरम्यान, फेसबुकवरचा लोड वाढला असला, तरी त्यातून जाहिराती मिळत नसल्यामुळे फेसबुकला आर्थिक फायदा मात्र होत नाहीये. बहुतेक लोड हा व्हिडिओ कॉलिंग आणि मेसेजिंगमुळे येत असल्यामुळे आणि जाहिरातदारांकडून देखील जाहिराती मिळत नसल्यामुळे फेसबुकला आर्थिक फायदा होईनासा झाला आहे!


हेही वाचा – १०० देश, २० व्हिडिओ कॉन्फरन्स, चीन शिकवतोय जगाला धडा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -