Video: तहानलेल्या कोब्रा सापाला त्याने पाजलं हाताने पाणी!

offering water to a cobra old video of forest officer goes viral on social media

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. याकाळात उन्हाच्या तप्त झळा जाणवू लागल्या आहेत. यामुळे सतत तहान लागत आहे. अनेकदा आपण या काळात प्राण्यांना पाणी पाजवताना पाहत आहोत. पण तुम्ही कधी तहानलेल्या कोब्रा सापाला पाणी पिताना पाहिले आहे का? दरम्यान असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तहानलेल्या कोब्रा सापाला पाणी पाजवताना एक अधिकार दिसत आहे.

या व्हिडिओमधील अधिकाऱ्याने कोब्रा सापाच्या तोंडाला पाण्याची बाटली पाजवताना दिसत आहे. व्हिडिओत कोब्रा  साप आरामात पाणी पित आहे आणि व्हिडिओत मधील अधिकारी देखील एखाद्या लहान बाळाला पाणी पाजवतात तसे ते त्या कोब्रा सापाला पाणी पाजवताना दिसत आहेत. जवळपास दोन मिनिटे कोब्रा साप पाणी पित आहे.

हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अविनाश सरन यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा एक जुना व्हिडिओ असून त्यांनी हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, ‘वनविभागाचे अधिकारी तहानलेल्या कोब्रा सापाला पाणी पाजवत आहेत.’ सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होता आहे. तसेच या वनविभागाच्या अधिकाऱ्याच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे.


हेही वाचा – Video: रितेशचा ‘हा’ व्हिडिओ पाहून चाहते झाले हैराण, म्हणाले ‘भावा टिकटॉक डिलीट कर’