धक्कादायक! नवजात बालकाला इंजेक्शन दिल्यानंतर हात पडला काळा

reaction after vaccination birth baby hand turned black poison vidisha bhopal
धक्कादायक! नवजात बालकाला इंजेक्शन दिल्यानंतर हात पडला काळा

जन्मानंतर एका नवजात बाळाला इंजेक्शन दिल्यानंतर ताप आला आणि काही दिवसांनंतर त्या बाळाचा हात काळा पडल्याचे कुटुंबियाच्या समोर आले. त्या बाळा कालबाद्य झालेले इंजेक्शन देण्यात आले. ज्यामुळे हातात विष पसरले आणि हात काळा पडला, असे देखील या घटनेबाबत म्हटले जात आहे. ही घटना मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील आहे.

२४ ऑगस्ट रोजी या बाळाचा जन्म विदिशा जिल्ह्यातील रुग्णालयात झाला. जन्मानंतर बाळाला उपचारादरम्यान हातात इंजेक्शन दिल्यानंतर हात काळा पडायला लागला. यानंतर रुग्णालयातील स्टाफने या बाळाला एनआयसीयूमध्ये दाखल केले.

यासंदर्भात ग्यारसपुरच्या लोहर्रा गावात राहणारे बाळाचे वडील मनोज सेन यांनी सांगितले की, त्याची पत्नी मिथिलेशने २४ ऑगस्ट रोजी एका निरोगी बाळाला जन्म दिला. त्याला इंजेक्शन दिल्यानंतर ताप आला आणि त्यानंतर मुलाला एनआयसीयू वॉर्डमध्ये दाखल केले.

कुटुंबियांनी वारंवार विचारणा करूनही रुग्णालयाने त्या बाळाला दाखवले आहे. ५ ते ७ दिवसानंतर जेव्हा कुटुंबाने पुन्हा एकदा दबाव टाकून विचारणा केली तेव्हा रुग्णालयाने बाळाला भोपाळच्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये रेफर केल्याचे सांगितले. मग त्यानंतर कुटुंब तातडीने भोपाळला पोहोचले तेव्हा बाळ आयसीयूमध्ये दाखल केल्याची माहिती मिळाली. जेव्हा कुटुंबाने बाळाचा उजवा हात पाहिला तेव्हा तो काळा झाला होता.

डॉक्टरांनी कुटुंबियांना हाताला गंभीर संक्रमण झाल्यामुळे तो हात ऑपरेशन करून कापला जाईल असे सांगितले. माहितीनुसार असे सांगितले जात आहे की, मुलाला कालबाद्य झालेले इंजेक्शन देण्यात आले होते. ज्यामुळे मुलाच्या हातात विष पसरून तो काळा पडला. सध्या याबाबत डॉक्टर अधिकृतपणे बोलण्यास तयार नाही आहेत.


हेही वाचा – मोबाईल हाताळता येत नसल्यामुळे नवऱ्याने केला बायकोचा खून!