घरटेक-वेकआयफोन युजर्ससाठी WhatsApp घेऊन येणार खुशखबर

आयफोन युजर्ससाठी WhatsApp घेऊन येणार खुशखबर

Subscribe

आयफोन युजर्सना iOS टेस्ट फ्लाइट App द्वारे टेस्टींग करून डार्कमोड वापरता येणार आहे.

आयफोन युजर्ससाठी WhatsApp एक आनंदाची बातमी घेऊन येत आहे. WhatsApp चा डार्कमोड फिचर आता आयफोन युजर देखील वापरू शकणार आहेत. आयफोन युजर्सना iOS टेस्ट फ्लाइट App द्वारे टेस्टींग करून डार्कमोड वापरता येणार आहे. बऱ्याच कालावधीपासून WhatsApp चा डार्कमोड हा युजर्ससाठी वापरात येणार असल्याचे सांगितले जात होते.

whatsapp new feature

- Advertisement -

आपल्या युजर्ससाठी WhatsApp दरवेळी नवनवीन फिचर्स आणत असते. एंड्रॉइड युजर्ससाठी WhatsApp चा डार्कमोड मागील काही दिवसांपासून सुरू करण्यात आला आहे. या टेस्ट नंतर WhatsApp त्याचे अपडेट लवकरात लवकर आयफोन युजर्ससाठी जारी करणार आहेत. ज्या आयफोन युजर्सकडे WhatsApp चे २.२०.३० हे व्हर्जन असल्यास त्याचा डार्क मोड वापरता येणार आहे.

‘डार्क मोड’साठी काय आवश्यक?

आयफोन युजर्ससाठी WhatsApp चा डार्क मोड वापरता येणार आहे मात्र त्यासाठी तुमच्या आयफोनमध्ये iOS 9 किंवा याहुन अधिकचा WhatsApp व्हर्जन असने आवश्यक आहे. एंड्रॉइड युजर्ससाठी बीटा व्हर्जनमध्ये हे फिचर्स देण्यात आले आहेत. यात डार्क मोड सोबतच काही नवीन डार्क वॉलपेपरचा समावेश करण्यात आला आहे. येणाऱ्या काळात कंपनी लवकरच आयफोन युजर्ससाठी देखील नवीन सॉलिड कलर वॉलपेपर देण्यात येणार आहेत.

- Advertisement -

मात्र अद्याप कंपनी iOS साठी फायनल बिल्ड केंव्हा जारी करणार, या संदर्भात कंपनीने सांगितले नाही आहे. WhatsApp च्या डार्क मोडचा वापर हा एंड्रॉइड युजर्ससोबत बीटा टेस्टरस देखील WhatsApp च्या डार्क मोडचा वापर करू शकणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -