घरमहाराष्ट्रमतदानाच्या दुसर्‍या दिवशी गैरहजेरी लागणार नाही

मतदानाच्या दुसर्‍या दिवशी गैरहजेरी लागणार नाही

Subscribe

निवडणूक कामातील कर्मचारी, शिक्षकांना दिलासा

निवडणुकीच्या कामामुळे मतदानाच्या दुसर्‍या दिवशी अनेक कर्मचारी व शिक्षकांना कामावर पोहचण्यास अडचणी येतात. त्यामुळे त्यांची कामावर गैरहजेरी लावण्यात येते. परंतु मतदानाच्या दिवशी निवडणूक प्रक्रियेत उशिरापर्यंत व्यस्त राहणार्‍या कर्मचारी व शिक्षकांना यावर्षी दिलासा देण्यात आला आहे. उशिरापर्यंत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना मूळ कामावर पोहचता न आल्यास त्यांची गैरहजेरी लावण्यात येऊ नये असे आदेश जिल्हाधिकार्‍यांकडून काढण्यात आले आहे.

मुंबईमध्ये कार्यरत असलेले अनेक कर्मचारी हे ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात राहण्यासाठी आहेत. त्यांना 21 ऑक्टोबरला मतदानाची ड्युटी संपवून रात्री घरी जाण्यास उशीर होतो किंवा दुसरा दिवसही जातो. तसेच अनेक मतदारसंघामध्ये कर्मचार्‍यांना मतदानाचे साहित्य मुख्यालयात पोहचवण्यासाठी दुसरा दिवशीही काम करावे लागते. त्यामुळे अनेक कर्मचार्‍यांना दुसर्‍या दिवशी मूळ अस्थापनेतील कामावर पोहचण्यात अडचणी येतात. परिणामी त्यांची गैरहजेरी लावण्यात येते. यासंदर्भात कर्मचारी व शिक्षक संघटनांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. याची दखल घेत यावर्षी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांनी मतदानाच्या दिवशी घरी जाण्यास विलंब होणार्‍या कर्मचार्‍यांना दिलासा दिला आहे.

- Advertisement -

मतदानाचे काम पूर्ण करून घरी जाण्यास विलंब होत आहे किंवा मतदान केंद्रावरून मुख्यालयात पोहचण्यास जास्त वेळ लागतो. अशावेळी मतदार संघात मतदान साहित्य जमा करण्याच्या तारखेनंतरचा दिवस हा सामान्य कर्तव्य कालावधी मानण्यात यावा. तसेच सामान्य कर्तव्य कालावधीत कर्मचार्‍यांची गैरहजेरी मानण्यात येऊ नये, असे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी सर्व सरकारी कार्यालयांना दिले आहेत. त्यामुळे यंदा निवडणुकीच्या कामामध्ये उशिरापर्यंत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -