मुख्यमंत्री लबाड वागले म्हणूनच दिला आमदारीचा राजीनामा – अनिल गोटे

Maharashtra
anil gote
आमदार अनिल गोटे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शब्दांचे खेळ करतात, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केला होता. तर याच मुद्यावरून आता भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनीही फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीसांच्या लबाडीच्या वागण्यामुळेच मी पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता, असे गोटे म्हणाले आहे. या संबंधी अनिल गोटे यांनी एक पत्रक काढले असून राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फसवणूक केल्याचा आरोप उध्दव ठाकरे यांनी केला आहे. मात्र याचे मला अजिबात आश्चर्य वाटले नाही. कारण माझा स्वतःचा अनुभव या पेक्षा वेगळा नसल्याचे गोटे या पत्रकात म्हणाले.

इतकेच नव्हे तर देवेंद्र फडणवीसांच्या अशा लबाडीच्या वागण्यामुळेच मी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा देऊन पक्षातून बाहेर पडलो होतो. फडणवीस यांच्याकडून सत्याची अपेक्षा करणे म्हणजे धोत्र्याच्या फुलाकडून गुलाबाची अपेक्षा करणे, असेही अनिल गोटे यावेळी म्हणाले. सध्या राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा निर्माणा झाला असून भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. अशातच भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनीही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा –

‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करा’ मातोश्रीबाहेर बॅनरबाजी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here