घरमहाराष्ट्रनाशिकभुजबळसाहेब बाबासाहेबांना कमी लेखतात का?

भुजबळसाहेब बाबासाहेबांना कमी लेखतात का?

Subscribe

नाशिकमधील जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांचा खडा सवाल

दलित आणि शोषितांचा आवाज बनणार्‍या महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या, अशी आग्रही मागणी आम्ही केली आहे. मात्र छगन भुजबळ यांनी भारतरत्नपेक्षा महात्मा ही पदवी मोठी असल्याचे सांगितले. म्हणजेच भुजबळ हे बाबासाहेब आंबेडकर यांना कमी लेखतात का, असा खडा सवाल मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना नाशिकमधील सभेत केला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी राज्य सरकारच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून केली जाते आहे. स्वा. सावरकरांना भारतरत्न देऊ नये, अशी भूमिका काँग्रेसने घेतल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, सावरकरांना विरोध करणारी औलादही महाराष्ट्रात आहे, याचे दुःख वाटते. अशा भ्रष्ट काँग्रेसींना भ्रष्टरत्न पुरस्कार द्यावा. स्वा. सावरकरांसोबतच दलित व शोषीतांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा घेऊन जाणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनादेखील भारतरत्न द्यावा, अशी आमची आग्रही मागणी आहे. मात्र, भुजबळसाहेबांनी भारतरत्नपेक्षा महात्मा ही पदवी अधिक मोठी असल्याचे एका मुलाखतीत सांगितले. आता भुजबळसाहेबांनी स्पष्ट करावे की, ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कमी लेखतात का? हीच भूमिका त्यांच्या पक्षाची आहे का, असा सवालही मुख्य़मंत्र्यांनी राष्ट्रवादीला केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -