घरमुंबईसत्ता नसताना रस्त्यावर तांडव करून दाखवलं - राज ठाकरे

सत्ता नसताना रस्त्यावर तांडव करून दाखवलं – राज ठाकरे

Subscribe

राज ठाकरेंनी भांडुप येथे घेतलेल्या सभेमध्ये पीएनबी बँक घोटाळ्यावर जोरदार निशाणा साधला.

विधानसभा निवडणुकांसाठी राज ठाकरे यांनी भिवंडीमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी आपल्या विरोधी पक्ष देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. त्यासोबतच, रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि सामान्यांकडून न केली जाणारी विचारणा, यावर त्यांनी यावेळी भाष्य केलं. ‘महाराष्ट्रात सध्या सगळेच सत्तेसाठी धावत आहेत. पण चांगला, सक्षम विरोधी पक्ष राज्यात नसेल, तर सरकार बेफाम होतात आणि वाट्टेल ते निर्णय देतात. १९८२ साली मी पहिल्यांदा भिवंडीत आलो होते. तेव्हा १२ वर्ष भिवंडीत शिवजयंती साजरी करायला बंदी होती. ती जेव्हा दिली, तेव्हा मी इथे आलो होतो. इथले रस्ते खराब झाले आहेत. कसे जगता तुम्ही? अशा थंड बसलेल्या लोकांचं नेतृत्व करायला मला आवडत नाही. तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा राग कसा येत नाही? मेक्सिकोमध्ये रस्ते चांगले नाही म्हणून तिथल्या मेयरला लोकांनी दोरीने बांधून फरफटत नेला. इथे इतकं सगळं होऊनसुद्धा आम्हाला राग येत नाही’, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

‘रस्त्यावरचा विरोधी पक्ष मी दाखवून दिलाय’

‘रस्त्यावरचा विरोधी पक्ष मी आजपर्यंत तुम्हाला दाखवला आहे. विधानसभेतला विरोधीपक्ष काय असतो, ते आता मी तुम्हाला दाखवून देईन. जी माणसं तुम्ही निवडून देणार, त्यांच्यावर पहिला अंकुश माझा असणार. आणि त्यांचा या सरकारवर अंकुश असणार’, असं यावेळी राज ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

‘सत्ता नसताना रस्त्यावर तांडव करून दाखवलं’

‘आपण चुकीचं वागलो, तर जनता आपल्याला घरी बसवू शकते, ही भितीच सत्ताधाऱ्यांना राहिलेली नाही. ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीमधल्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते, ते सगळे आज भाजप-शिवसेनेत गेले. म्हणजे पुन्हा सत्तेत तेच बसणार. जोपर्यंत तुम्ही यांना घरी बसवत नाहीत, तोपर्यंत हे वठणीवर येणार नाही. लोकसभेचे जेव्हा निकाल लागले, तेव्हा मी म्हणालो होतो हे सगळं ‘अनाकलनीय’ आहे. लोकांना काय अपेक्षित आहे, हे कळतच नाही. जर तुमच्या मनातला राग तुम्हाला व्यक्त करायचा असेल, तर हीच निवडणुकीची ती वेळ आहे. माझ्या हाती सत्ता नसताना मी रस्त्यावर जे तांडव करून दाखवले आहेत, ते तुम्ही पाहिलं आहे. टोलनाक्याचं आंदोलन मनसेनं केलं तेव्हा राज्यातले ७८ टोल बंद झाले. आणि सेना-भाजपने सत्ता आल्यावर टोलमुक्त महाराष्ट्रचं आश्वासन दिलं होतं. अजूनही टोल सुरूच आहेत’, असा टोला देखील राज ठाकरेंनी यावेळी लगावला.

पीएमसी बँकेवर साधला निशाणा

‘माझ्याकडे सकालीच पीएनबी बँकेचे लोकं आले होते. ते सगळे अक्षरश: रडत होते. आमचेच पैसे आम्हाला मिळत नाहीत असं म्हणत होते. बँकेतल्या लोकांनी त्यांच्या जवळच्या लोकांना सांगितलं की तुमचे पैसे घेऊन जा. आणि दुसऱ्याच दिवशी बँक बंद केली. एकाच कंपनीला ६-७ हजार कोटींचं कर्ज दिलं, ती कंपनी बंद पडली. आणि सामान्य खातेदार रस्त्यावर आले’, असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

‘खड्डे नाही, तर कंत्राटदारांना कामं कुठून मिळणार?’

‘रस्त्यांवरचे खड्डे मुंबईत आहेत, पुण्यात आहेत, भिवंडीत आहेत. पण नाशिकमध्ये नाहीत. नाशिक पालिका माझ्याकडे होती, तेव्हा मी आयुक्तांना खड्ड्यांबद्दल सांगून ठेवलं होतं. आधी ज्या कंत्राटदारांकडून केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडायचे, त्याच कंत्राटदारांनी नंतर केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडत नव्हते. रस्ते चांगले झाले, तर खड्डे कुठून पडणार? आणि खड्डे पडले नाहीत, तर कंत्राटदारांना कामं कुठून मिळणार? अशी कामं केली जातात’, असं देखील राज ठाकरे यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -