घरमुंबई'उद्धव ठाकरे जनतेच्या इच्छेला मान देतील', मुख्यमंत्रीपदावर संजय राऊतांचं विधान!

‘उद्धव ठाकरे जनतेच्या इच्छेला मान देतील’, मुख्यमंत्रीपदावर संजय राऊतांचं विधान!

Subscribe

राज्याचे पुढचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, यासंदर्भातलं एक महत्वपूर्ण सूचक विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

राज्यातल्या सत्तास्थापनेसंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सकाळी पत्रकार परिषद घेऊन चर्चा सुरू करून दिली आहे. ‘उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील का?’ या प्रश्नावर संजय राऊतांनी सूचक विधान केलं आहे. ‘आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की उद्धव ठाकरेंनीच मुख्यंमत्री व्हावेत. आम्ही सगळे रात्री शरद पवारांना भेटलो. माझ्या मुख्यमंत्रीपदाविषयीचा मुद्दा नाही. जनतेची इच्छा आहे की उद्धव ठाकरेंनी या महाविकास आघाडीचं नेतृत्व करावं. महाराष्ट्राच्या इच्छेला उद्धव ठाकरे मान देतील याविषयी माझ्या मनात शंका नाही’, असं संजय राऊत म्हणले. त्यासोबतच, आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाविषयी विचारलं असता ‘आदित्य ठाकरेंचं नेतृत्व महाराष्ट्राला हवं आहे. पण या घडीला महाविकासआघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनीच करावं, असं तिन्ही पक्षातल्या प्रमुख नेत्यांचं म्हणणं आहे’, असं देखील संजय राऊत म्हणाले. त्यामुळे, शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे किंवा खुद्द संजय राऊत यांच्याऐवजी थेट उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर होण्याची शक्यता वाढली आहे.


हेही वाचा – रात्री उशिरा उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; फॉर्म्युल्यावर चर्चा?

‘ऑफरसाठी सेल संपला’, भाजपला टोला!

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊत यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे टोला लगावला. ‘शिवसेनेलं स्वत:च्या ताकदीनं महाराष्ट्राचं मुख्यंमत्रीपद स्वत:कडे ठेवलं आहे. आता कुणी इंद्राचं आसन जरी दिलं, तरी ते आम्हाला नको आहे. भाजपच्या कुठल्याही नेत्याकडून ऑफर आलेली नाही. कुणी काही ऑफर देत जरी असतील, तरी त्यांच्यासाठी सेल संपलेला आहे. शिवसेनेनं अभिमानानं हा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्राला ५ वर्ष कणखर नेतृत्व मिळेल’, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

- Advertisement -

५ वर्ष शिवसेनेकडेच मुख्यमंत्रीपद

‘तिन्ही पक्षांनी शिवसेनेकडेच ५ वर्ष मुख्यमंत्रीपद असायला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे पुढची ५ वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच राहील’, असं यावेळी संजय राऊतांनी सांगितलं. त्याशिवाय, राज्यपालांची आज भेट घेणार नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. ‘आज राज्यपालांची भेट घेणार नाही. कारण राष्ट्रपती राजवटीमध्ये नव्या सरकार स्थापनेची एक निश्चित प्रक्रिया आहे. तिन्ही पक्षांच्या निर्णयानुसार राज्यपालांकडे कधी जायचं, त्याविषयी निर्णय घेतला जाईल. दिल्लीतून अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे चर्चेसाठी येत आहेत’, असं ते म्हणाले


हेही वाचा – मातोश्री ‘चाणक्य’ बदलतेय का?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -