घरमुंबईमुख्यमंत्र्यांनी बोलावली आमदार, खासदार नगरसेवकांची बैठक; महत्त्वाच्या सूचना देणार

मुख्यमंत्र्यांनी बोलावली आमदार, खासदार नगरसेवकांची बैठक; महत्त्वाच्या सूचना देणार

Subscribe

महत्त्वाचे म्हणजे युती बाबत उलट-सुलट चर्चा सुरू असताना खासदार, आमदार आणि नगरसेवकांना युतीबाबत काहीही न बोलण्याचे आदेश या बैठकीत देण्यात येणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षाच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज संध्याकाळी मुंबईतील भाजपाच्या सर्व आमदार, खासदार आणि नगरसेवक यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुंबईत भाजपाची किती ताकद आहे? यासाठी प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे युती बाबत उलट-सुलट चर्चा सुरू असताना खासदार, आमदार आणि नगरसेवकांना युतीबाबत काहीही न बोलण्याचे आदेश या बैठकीत देण्यात येणार आहेत.

हेही वाचा – ईव्हीएम विरोधात विद्यार्थी भारतीचा काळा सप्ताह!

बैठकीत या सूचना देणार 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने तयारीला जोरदार सुरुवात केली आहे. त्यातच रविवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. यावेळी कलम ३७० रद्द केल्याबद्दल सरकारचे कौतुक केले जाणार आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत दाखल होण्यापूर्वी येथील जनतेला याबाबतची माहिती पोहोचवण्याची जबाबदारी मुंबईतील आमदार, खासदार आणि नगरसेवकांवर सोपविण्यात येणार आहे. याबाबत आजच्या होणाऱ्या बैठकीत त्याबाबती माहिती देखील देण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, या बैठकीत युती बाबत महत्त्वाची सूचना करण्यात येणार आहे. सध्या भाजप-शिवसेना युतीबाबत उलट-सुलट चर्चा सुरू असताना याबाबत खासदार, आमदार आणि नगरसेवकांना देखील युतीबाबत काही बोलू नये, असे आदेश देखील या वेळी देण्यात येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -