घरमुंबईदिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना घरपोच वाहतूक सुविधा

दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना घरपोच वाहतूक सुविधा

Subscribe

जिल्ह्यातील 18 विधानसभा क्षेत्रात असणार्‍या दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर सुलभ पद्धतीने जाण्यासाठी मोफत आणि घरपोच वाहतूक सुविधांची सोय करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी पुरविण्यात येणार्‍या सुविधांची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी पाहणी करून आढावा घेतला. यंदा भारत निवडणूक आयोगाचे ‘नो वोटर टू बी लेफ्ट बिहॅड’ असे घोषवाक्य आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही निवडणूक सुलभ निवडणूक म्हणून घोषित करण्यात आलेली आहे.

दिव्यांग मित्र समन्वयकाची नेमणूक
दिव्यांग मतदारांसाठी दिव्यांग समन्वयकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. संबंधित दिव्यांग मतदार यांनी राहत असलेल्या ठिकाणाहून जवळच्या ठिकाणच्या दिव्यांग मित्र समन्वयकास भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यास आवश्यक वाहन सुविधा घरपोच उपलब्ध करून देण्यात येईल. मतदारस मतदारास मतदानकेंद्रापर्यंत घेऊन जाऊन प्राधान्याने मतदान झालेनतर पुन्हा दिव्यांग मतदारास त्याच वाहनाने घरी सोडविले जाईल. या मतदारास विनासायास मतदान करता यावे यासाठी सर्वोतोपरी सहाय्य करण्यात येईल. जिल्हामध्ये एकूण 199 ठिकाणाहून एकूण 719 रिक्षा मतदानाच्या दिवशी पूर्णवेळ दिव्यांग व ज्येष्ठ मतदार यांच्यासाठी कार्यरत असतील.

- Advertisement -

हात दाखवा बस थांबवा
दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना 138 कल्याण ( प ), 142 कल्याण ( पूर्व ), 143 डोंबिवली, 144 कल्याण ( ग्रामीण ) 146 ओवळा – माजिवाडा, 147 कोपरी -पांचपाखाडी, 148 ठाणे, 149 मुंब्रा- कळवा. 150 ऐरोली, 151 बेलापूर असे दहा रिंगरूट तयार करण्यात आलेले असून या मार्गावर मतदानाच्या दिवशी म्हणजेच 21 ऑक्टोबरला दिव्यांग फ्रेंडली लो फ्लोवर बस चालू असणार आहे. या बसमधून हात दाखवा, बस थांबवा या धर्तीवर दिव्यांग व ज्येष्ठ मतदार या वाहतूक सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

दिव्यांग मतदारांसाठी सुविधा
दिव्यांग मतदारांना ब्रेल भाषेतील मतपत्रिका, शौचालय, दिव्यांग मित्र मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी झुऊ पची सुविधा देण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग तसेच वयोवृद्ध मतदारांकरिता व्हिलचेअर व रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिक मतदारांकरिता वेगळ्या रांगेची व्यवस्था देखील असणार आहे. अंध मतदारांच्या सोयीकरिता मतदान केंद्रांवरील सूचनाफलक आणि मतदार यादी, ब्रेल लिपीमध्ये तयार करण्यात आली आहे. मतदान यंत्रावर ब्रेल लिपी मुद्रीत केली असल्याने त्यांना कोणाच्याही मदतीखेरीज मतदान करता येणे शक्य आहे. लहान मुलासह मतदानास येणार्‍या महिला मतदारांच्या मुलांकरिता पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisement -

2395 स्वयंसेवकांची नेमणूक
जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी जिल्ह्यामध्ये विविध कॉलेजमधील एन. एस. एस. आणि इतर 2395 स्वयंसेवकांची नेमणूक केलेली आहे. त्यांचा वापर करून दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना सुलभ मतदान करता यावे यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -