घरमुंबईविक्रोळीत सुनील राऊत यांच्याविरोधातील भाजपची नाराजी कुणाच्या पथ्यावर

विक्रोळीत सुनील राऊत यांच्याविरोधातील भाजपची नाराजी कुणाच्या पथ्यावर

Subscribe

विक्रोळी विधानसभा मतदार संघातील आमदार आणि शिवसेना उमेदवार सुनील राऊत यांना भाजपच्या अंतर्गत नाराजीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली आहे. लोकसभा निवडणुकीत राऊत यांनी कमळ चिन्हाचा प्रचार करण्याऐवजी धनुष्यबाणाचा प्रचार केला होता. त्यातच भाजपचे किरीट सोमय्यांचा पत्ता कापण्यास राऊत हेच जबाबदार असल्याने भाजपची स्थानिक पातळीवर तीव्र नाराजी आहे. त्यामुळे ही नाराजी कुणाच्या पथ्यावर पडणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विक्रोळी विधानसभा मतदार संघातून यंदा महायुतीचे उमेदवार सुनील राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या आघाडीचे उमेदवार धनंजय पिसाळ,मनसेचे विनोद शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे सिध्दार्थ मोकळे असे दहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मागील निवडणुकीत सुनील राऊत यांनी ५८ हजार ५५६ मते मिळवून विजय मिळवली होती, मनसेचे मंगेश सांगळे यांनी २४ हजार ९६३ मते मिळवली होती. तर राष्ट्रवादीचे संजय दिनापाटील यांना २० हजार २३३ मते मिळाली होती. परंतु यंदा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने धनंजय पिसाळ हे निवडणूक रिंगणात उतरले आहे.

- Advertisement -

पण संजय दिना पाटील हे शिवसेनेत गेले आहेत. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांची बेरीज केल्यास ३८ हजार मतदान झाले होते. त्यामुळे भाजपची नाराजी शिवसेना उमेदवार सुनील राऊत यांच्या विरोधात गेल्यास राष्ट्रवादीचे पिसाळ यांचा विजय लांब नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पूर्ण शक्तीनिशी मैदानात उतरले आहेत.

मागील पाच वर्षांमध्ये सुनील राऊत हे केवळ कमानीपुरतेच मर्यादीत राहिले आहेत. प्रत्येक इमारतीला प्रवेशद्वार बांधून त्यावर स्वत:चा फोटो झळकवून घ्यायचे. परंतु, त्यापलिकडे विक्रोळीचा विकास झालेला नाही. त्यामुळे विक्रोळी-कांजूरमार्ग भांडुपची जनता नाराज आहे. त्यामुळे मनसेचे विनोद शिंदे व वंचितचे सिध्दार्थ मोकळे हे किती मतदान घेतात यावरच सर्व अवलंबून आहे. पाच वर्षांत कोणतीही ठोस कामे न करणार्‍या सुनील राऊत यांच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय पिसाळ हे पुढील पाच वर्षांचा वचननामा जनतेसमोर ठेवत प्रचार करत आहेत. गेली अनेक वर्षे धनंजय पिसाळ आणि त्यांची पत्नी भारती पिसाळ या नगरसेवक म्हणून काम करत आहेत.

- Advertisement -

मुंबई महापालिकेचे गटनेते म्हणून त्यांनी सक्षमपणे काम केले. त्यानंतर, या निवडणूक रिंगणात उतरल्यानंतर विक्रोळी-कांजूर-भांडुप परिसरात असलेल्या केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या दप्तरी अडकून पडलेल्या सर्व भूखंड हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावला जाईल,असे आश्वासन त्यांनी दिले आहे. तर विक्रोळीतील म्हाडा इमारतींमधील सदनिकांवर आकारण्यात आलेल्या सेवाशुल्क व त्यावरील व्याज यातून नागरिकांचा पूर्णपणे व कायमस्वरुपी सोडवणूक करणे. केवळ कागदोपत्रीच नव्हे तर प्रत्यक्ष यातून मुक्ती दिली जाईल,असे स्पष्ट करत पिसाळ यांनी हा परिसर गुन्हेगार मुक्त करण्याची ग्वाही जनतेला दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -