घरदेश-विदेशचीनमध्ये भूकंप; ११ जणांचा मृत्यू, १२२ जण जखमी

चीनमध्ये भूकंप; ११ जणांचा मृत्यू, १२२ जण जखमी

Subscribe

चीनमध्‍ये झालेल्या भूकंपामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून १२२ जण जखमी झाले आहेत.

चीनच्या सिचुआन भागाला भूकंपाचा धक्का बसल्याची घटना सोमवारी घडली आहे. या भूकंपात ११ जणांचा मृत्यू झाला असून १२२ लोक जखमी झाले आहेत. या भूकंपाचे दोनवेळा धक्के बसल्याची माहिती तेथील स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

चीनमधील भूकंप केंद्राकडून (सीईएनसी) मिळालेल्‍या माहितीनुसार, सोमवारी रात्री ६.० रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा पहिल्या भूकंपाचा धक्‍का यिबिन शहरातील चांगिंग काउंटी येथे बसला होता. भूकंपाची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा सकाळी दुसरा तीव्रतेचा धक्का बसला आहे. .३ रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा धक्‍का मंगळवारी बसला. या भागातील काही लोकांचा मृत्‍यू तर काही जखमी झाल्‍याची माहिती समोर आली आहे. जखमींना उपचारासाठी हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले आहे. यिबिन शहरातील लोकांच्‍या मते, भूकंप झाल्‍यानंतर आर्धा तास भूकंपाचे धक्‍के जाणवत होते. भूकंप झाल्‍यानंतर या भागातील लोक घाबरुन घरातील कोपर्‍यात जावून बसले आणि आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, भूकंपाची तीव्रता वाढली तसे लोक घराच्‍या बाहेर पडले. चेंग्दु येथील अर्ली वॉर्निंग सिस्टीमकडून भूकंप होण्‍याआधी एक मिनिट आधी लोकांना सतर्क केले होते. यानंतर एका मिनिटानंतर लोकांना भूकंपाचा धक्‍का जाणवला.

- Advertisement -

बचाव कार्य सुरु

चीनमध्‍ये झालेल्या भूकंपामुळे बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरु आहे. स्‍थानिक माध्‍यामांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार चीनच्‍या सरकारकडून भूकंप झालेल्‍या भागात पाच हजार टेंट, १० हजार पलंग, २० हजार रजाई यासारख्‍या वस्‍तूंची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -