घरदेश-विदेशहिमाचल प्रदेशात बस दरीत कोसळून भीषण अपघात

हिमाचल प्रदेशात बस दरीत कोसळून भीषण अपघात

Subscribe

४४ जणांचा मृत्यू आणि ३० जण जखमी

हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये ४४ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ३० जण जखमी झाले आहेत. ही बस कुल्लूवरून गाडागुशैणीली येथे जात होती. त्याच दरम्यान बसलाचा दरीत कोसळून भीषण अपघात झाला.

- Advertisement -

ही बस कुल्लू जिल्ह्यातील बंजारपासून एक किलोमीटर अंतरावरील भियोठच्या जवळ ५०० फूट दरीत कोसळली. या बसमध्ये ७५ पेक्षा जास्त प्रवाशी प्रवाश करत होते. दरीत कोसळलेल्या बसमधून प्रवाशांना वाचवण्यासाठी पोलीस आणि स्थानिक नागरिक धावू आले आहेत. नदीच्या जास्तगती असलेल्या प्रवाहच्यामधून प्रवाशांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले जात आहे.

- Advertisement -

या घटनेत १२ महिला, ६ मुली, ७ लहान मुले आणि १० तरुण या सर्वांचा बचाव करण्यात यश आले आहे. तसेच काहीजणांची गंभीर प्रकृती आहे. या घटनास्थळी प्रशासकीय अधिकारी आणि पोलीसांचे पथक पोहचले आहे.

या दुर्घटनेबद्दल राहूल गांधी यांनी टि्वट केलं आहे. ‘हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये झालेल्या बस दुर्घटना ही दुःखद घटना आहे. या घटनेत मृत्यू झालेले लोकांच्या बद्दल दुःख व्यक्त करतो आणि जे जखमी लोक झाले आहेत ते लवकर सुखरुप होऊ दे अशी प्रार्थना करतो. काँग्रेस पार्टीच्या कार्यकत्यांकडून पीडितांना मदत केली जाईल, असे आवाहन करतो.’ असं टि्वटमध्ये राहूल गांधी यांनी लिहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -