घरदेश-विदेशसुषमा स्वराज झाल्या 'ट्रोल'

सुषमा स्वराज झाल्या ‘ट्रोल’

Subscribe

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या त्यांच्या सोशल अकाऊंटवर नेहमीच अॅक्टीव्ह असतात. परदेशात अडकलेल्यांनी त्यांच्याकडे सोशल मीडियावर फक्त मदत मागावी आणि त्यांनी ती करावी, असेच नेहमी होते. त्याच्या या अॅक्टीव्ह निर्णयामुळेच त्यांच्या कामाची वाहवा होत असते. पण आता लखनऊच्या पासपोर्ट प्रकरणामुळे आता सुषमा स्वराज ट्रोल होऊ लागल्या आहेत. नेटीझन्सनी त्यांची ट्विटरवरच शाळा घेतली आहे.

का झालं ट्रोलिंग?

लखनऊमधील तन्वी सेठ यांनी पासपोर्टसाठी एका अधिकाऱ्याने धर्म बदलायला लावला, असे ट्विट केले. त्यानंतर लागलीच याची प्रसारमाध्यमांनी दखल घेतली. आणि दुसऱ्याच दिवशी तन्वीला पासपोर्ट देण्यात आला. पण आपल्याला या प्रकरणाबाबत काहीच माहित नसल्याचे सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन सांगितले.आणि त्यावर त्या ट्रोल झाल्या. एरव्ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या आता गप्प का?,या शिवाय ज्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली त्याला कारण नसताना शिक्षा का ? असे प्रश्नही नेटीझन्स विचारत आहे

- Advertisement -

- Advertisement -

विकास मिश्रांच्या बदलीवर नाराज

एकीकडे सुषमा स्वराज ट्रोल होत असताना पासपोर्ट अधिकारी विकास मिश्रांच्या बदलीवर मात्र नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. नेमक्या प्रकरणाची चौकशी न करता त्यांची तडकाफडकी बदली सुषमा स्वराज यांच्या अनुपस्थितीत का केली? हा प्रश्नही केला जात आहे.

वाचा- http://आता पासपोर्ट प्रकरणाला वेगळेच वळण..
http://‘धर्म बदला आणि पासपोर्ट घ्या’, दिल्लीत..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -