घरलाईफस्टाईलफायदेशीर अंजीर

फायदेशीर अंजीर

Subscribe

पित्त, अपचन मुळव्याध, मधुमेह, कफ, फुफ्फुसासंबंधी सुजन आणि अस्थमा यांच्या उपचारासाठी केला जातो.

उंबरासारखे दिसणारे अंजीर हे फळ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे. अंजीर हे ताजे आणि सुके दोन प्रकारात बाजारात उपलब्ध असतात. अंजीरपासून अनेक फायदे आहेत. याचा वापर पित्त, अपचन मुळव्याध, मधुमेह, कफ, फुफ्फुसासंबंधी सुजन आणि अस्थमा यांच्या उपचारासाठी केला जातो. अंजीरातील विविध खनिज, जीवनसत्वे आणि तंतू मुळे आपल्यासाठी ते अत्यंत स्वास्थकारी मानले जाते. चांगल्या आरोग्यासाठी लाभदायक पोषके, जीवनसत्व “A”, B1, B2, अंजीरमध्ये पाणी 80%, कॅल्शियम घटक 0.06%, कार्बोहायड्रेट 63%, फायबर 2.3%, प्रोटीन 3.5%, क्षार 0.7%, सोडियम, पोटॅशियम, तांब, सल्फर आणि क्लोरिन घटकही मुबलक प्रमाणात असतात.

- Advertisement -

आजकाल धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला काहीना काही त्रास, दुखणं सतावत असते. दिवसभर कम्युटर, लॅपटॉपसमोर बसल्याने, चूकीच्या पद्धतीने आहारात पदार्थांचा समावेश केल्याने, अपुर्‍या झोपेमुळे कंबरेचे, पायाचे दुखणे वाढते. तुमच्या आहाराकडे थोडं लक्ष दिल्यास अनेक दुखण्यांपासून आराम मिळू शकतो. आजकाल अनेक लहान आजार आबालवृद्धांमध्ये आढळतात.  अशा दुखण्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात अंजीरचा समावेश करणं फायदेशीर ठरतं

हे आहेत अंजीर खाण्याचे फायदे

  • अंजीर खाणे शरीरासाठी खूपच फायद्याचे आहे. अंजीर हृदयरोगापासून ते अॅनिमियापासून वाचवते. याच्या सेवनामुळे प्रोटेस्ट कॅन्सरला अटकाव घालण्यास मदत होते तसेच ब्रेस्ट आणि कोलोन कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते
  • अंजीर प्रोटेस्ट कॅन्सरला अटकाव घालते. याने ब्रेस्ट आणि कोलोन कॅन्सरचा धोका कमी होतो.
  • अंजीरमध्ये पॅकटीन नावाचे सॉल्युबल फायबर आढळते. तो ब्लड कोलेस्ट्रेरॉल घटवण्यासाठी मदत करते. यात ओमेगा-३, ओमेगा-६ आणि पोटॅशियम असते. याने रक्तदाब चांगला राहतो. त्यामुळे हृदयरोगापासून वाचते.
  • मधुमेहाच्या रुग्णासाठी अंजीर खूप फायद्याचे असते. त्याच्या पानांचा काढा बनवून प्या. याने इंसुलिनच्या इंजेक्शनची गरज कमी होते. अस्थामाच्या रुग्णांसाठी याचे पान फायद्याचे असते.
  • अंजीरमध्ये फायबर जास्त असते आणि कॅलरी कमी होते. त्यासाठी वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी अंजीर चांगली असते.
  • कॅल्शियम आणि लोह असते. ते अनिमियाच्या धोका कमी करते. याने रक्तासंबंधी इतर आजार कमी होतात. अंजीर खाण्याने मलावरोधाची समस्या कमी होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -