घरमहाराष्ट्रनाशिकगुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यावर महापालिका ठाम

गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यावर महापालिका ठाम

Subscribe

उपलब्ध असलेल्या अत्यल्प पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून अंमलबजावणी

नाशिक धरणात मनपाच्या हिश्श्याचे अत्यल्प पाणी शिल्लक राहिलेले आहे. तसेच गंगापूर धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे गंगापूर धरणसाठ्यात वाढ झालेली नाही. ही परिस्थिती अनेक वर्षानंतर उदभवलेली आहे. त्यामुळे शहरात पाणीबाणी निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आता दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी येत्या गुरुवार (दि.4) पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.

नाशिक महापालिकेने आज (दि.2) धरण क्षेत्रातील पावसाचा आढावा घेऊन शहरातील पाणी पुरवठ्याचे फेर नियोजन केलेले आहे. 30 जूनपासून शहरात एकवेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय मनपाने घेतल्यानंतर पाणीपुरवठा विभागातर्फे सध्या पाणीपुरवठा एकवेळ करण्यात आलेला आहे. मात्र, जुलै महिना उघडा तरी शहराला पाणी पुरवठा करणार्‍या मुकणे, दारणा आणि गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुबलक पाऊस झालेला नाही. दारणा धरणातून येणारे पाणी चेहडी बंधार्‍यातून उचलून ते गांधीनगर जलशुद्धीकरणात शुद्ध करून नाशिकरोड परिसराला पुरवले जाते. गंगापूर धरणातून पाणी उपसाकरून ते अशोकनगर, पंचवटी आदी जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून शहराला पुरवले जाते. नव्याने मुकणे धरणातून पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा सुरू झालेला आहे. दारणा धरणात मनपाच्या हिश्श्याचे पाणी संपलेले आहे. गंगापूर धरणात मनपाच्या आरक्षित पाण्यापैकी जेमतेम साठा शिल्लक राहिलेला आहे.

- Advertisement -

येत्या काळात चांगला पाऊस होऊन धरणांमध्ये जलसाठा होईपर्यंत आहे, ते पाणी काटकसरीने वापरून नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी दैनदिन पाणीपुरवठ्याचे फेर नियोजन मनपा पाणीपुरवठा विभागाने केलेले आहे. एकवेळ पाणी पुरवठ्याचा निर्णय मनपाने 30 जूनला घेतला होता. नंतरच्या काळात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झालेला नसल्याने धरणसाठ्यात काहीच भर पडलेली नाही. त्यामुळे दर गुरवारी शहरात पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पाणी पुरवठ्याचे फेरनियोजन

सोमवारी नाशिक शहर परिसरात मुसळधार पाऊस झाला. मात्र, गंगापूर धरणाचे पाणलोट क्षेत्र त्र्यंबकमध्ये अवघा 7 मिमी पाऊस झाला. त्यामुळे गंगापूर धरणात काहीच भर पडलेली नाही. चांगला पाऊस होण्यास आणि धरणसाठ्यामध्ये भर पडण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचे फेरनियोजन करण्यात आले आहे. दर गुरुवारी पाणी पुरवठा पूर्ण दिवस बंद राहणार आहे. – संदीप नलावडे, अधीक्षक अभियंता, मनपा पाणीपुरवठा विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -