घरमुंबईटाळ गजरात निघाली चिमुकल्यांची वारी

टाळ गजरात निघाली चिमुकल्यांची वारी

Subscribe

आषाढी वारीनिमित्त भिवंडीतील शाळेत वारीचे आयोजन करण्यात आले होते.

मैलोन् मैल चालत, पळत जाऊन वारकऱ्यांनी एव्हाना पंढरपूर गाठले आहे. संपूर्ण राज्य भक्तीसागरात न्हाऊन निघाले आहे. चिमुकल्यांनाही आषाढी एकादशीचे महत्व कळावे तसेच वारी, पालखीचा आनंद मिळावा यासाठी राज्यांतील बहुतांश शाळांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त कार्यक्राचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार भिवंडी शहरातील पीआर शाळा, ताडाळी येथील अभिनव बाल विद्या निकेतन या शाळेत वारी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांसोबत पूजा? असं काहीही नाही! – उद्धव ठाकरे

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची पारंपरिक वेशभूषा केली होती. विद्यार्थ्यांनी कपाळी गंध टिळा लावून हाती टाळांचा निनाद करीत विठूमाऊलीच्या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. तर विद्यार्थिनींनीसुद्धा डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन फुगड्या घालत वारीमध्ये सहभागी झाल्या होत्या. सकाळी शाळेपासून सुरु झालेली वारी पुढे हनुमान मंदिर ताडाळी, परिसरात जाऊन त्यानंतर तेथून मागे शाळा मार्गाकडे वळत शाळेत पालखी सोहळ्याची सांगता झाली. विशेष म्हणजे या इंग्रजी शाळेत असंख्य परप्रांतीय विद्यार्थी आहेत. त्यामुळे या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्याने या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

- Advertisement -

वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफीची मागणी 

आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांनी पंढरपूरला जाण्याची परंपरा आहे. ही परंपरा महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीचे अविभाज्य अंग आहे. यंदाही १२ जुलै रोजी येणाऱ्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातून वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्यामुळे या वारकऱ्यांच्या वाहनांना एकादशीच्या काळात टोलमाफी देण्याची मागणी शेवाळे यांनी केली आहे. मुख्यमंत्री, रस्ते व विकास मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे लेखी पत्राद्वारे खासदार शेवाळे यांनी ही मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -