घरमुंबईविक्रोळीत सापडलेल्या जखमी कोल्ह्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

विक्रोळीत सापडलेल्या जखमी कोल्ह्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

Subscribe

विक्रोळी येथील कन्नमवार नगर मध्ये जखमी अवस्थेत सापडलेल्या मादी कोल्ह्याला रॉ संस्थेने हॉस्पीटलमध्ये दाखल केले.

विक्रोळीच्या पूर्व द्रुतगती मार्गावर कन्नमवारनगर या परिसरात घायाळ अवस्थेत सापडलेल्या एका कोल्हीणीचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. या कोल्हीणीची माहिती स्थानिकांनी रॉ संस्थेला दिली. त्यानंतर, संस्थेच्या स्वयंसेवकांनी तिला ताब्यात घेत हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. या कोल्हीणीच्या पायाला दुखापत झाली होती. काही तपासण्या केल्यानंतर कळलं की त्याच्यावर शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे. त्यानुसार, डॉक्टरांनी त्याच्या पायाच्या तुटलेल्या हाडावर बोन प्लांटिंग सर्जरी केली. त्यामुळे, कोल्हीणीला जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आलं आहे.

बोन प्लान्टींग शस्त्रक्रिया

सोनेरी रंगाची कोल्हीण येथील रहिवाशांना दिसली होती. त्यातील एका नागरिकाने वन विभाग आणि रॉ संस्थेच्या हेल्पलाइनशी संपर्क साधला. त्यानंतर रॉ रेस्क्यु टीम आणि मुंबई रेंज वन विभाग यांनी विक्रोळी येथून भारतीय सोनेरी रंगाच्या कोल्हीणीला ताब्यात घेतले. त्यानंतर तिला तपासणी, उपचारांसाठी ठाणे एसपीसीएकडे नेण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर बोन प्लान्टींग शस्त्रक्रिया करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – शॉक ट्रीटमेंटने वाचवला बाळाचा जीव!

पशुवैद्यकीय हॉस्पीटलमध्ये पुढील उपचार

या कोल्हीणीवर ठाणे एसपीसीएचे डॉ. प्रीती साठे यांनी उपचार केले. उपचारानंतर कोल्हीणीला ४८ तासांपर्यंत डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले. यानंतर तिच्या तुटलेल्या हाडावर बोन प्लान्टींग शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. विक्रम दवे यांनी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केल्याने कोल्हीणीला जीवदान मिळालं आहे. पुढील उपचारांसाठी या कोल्हीणीला ठाण्याच्या एसपीसी या पशुवैद्यकीय हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -