घरदेश-विदेशजैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर मुन्ना लाहोरीचा खात्मा

जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर मुन्ना लाहोरीचा खात्मा

Subscribe

जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर मुन्ना लाहोरीचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे.

जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर मुन्ना लाहोरीला ठार मारण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. शनिवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमकी झाल्या. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर मुन्ना लाहोरीचा समावेश आहे. मुन्ना आईडी स्फोटके बनवण्यात तरबेज होता. त्याच्या नावावर दोन लाखाचे इनाम घोषित करण्यात आले होते. अखेर त्याचा ठार मारण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. ही चकमक दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील बोनाबाजार येथे झाली.

- Advertisement -

शोपियान जिल्ह्यातील बोनाबाजार येथे काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानुसार लष्कराच्या सैनिकांनी शनिवारी सकाळी या परिसराला घेराव घातला. जवानांना बघताच क्षणी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. भारतीय जवानांनी देखील दहशतवाद्यांच्या गोळाबाराला प्रत्युत्तर दिले. अखेर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले. सध्या या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -