घरमुंबईदोन मुलांच्या मृत्यूनंतर केडीएमसीच्या आरोग्य विभागाला आली जाग

दोन मुलांच्या मृत्यूनंतर केडीएमसीच्या आरोग्य विभागाला आली जाग

Subscribe

येथील मुलांच्या मृत्यूनंतर पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे तेथील परिसरातील मुलांच्या आरोग्याचे सर्वेक्षण करण्यात आले.

मेंदुज्वराने दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेचा वैद्यकीय विभाग खडबडून जागा झाला आहे. पालिकेच्या वैद्यकिय विभागाने तात्काळ सर्वेक्षण हाती घेतले. यावेळी परिसरातील तब्बल १ हजार ४५९ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात २६१ कंटेनर्सची तपासणी करण्यात आली असून १३ कंटेनर दूषित आढळून आले आहेत.

लहान मुलांच्या रक्ताचे नमुने पुण्याला पाठवणार 

कल्याण पश्चिमेतील वाडेघर परिसरात राहणारा ७ वर्षीय श्लोक मल्ला आणि गणेशवाडी परिसरात रहाणारी ४ वर्षीय तनुजा सावंत या दोन चिमुरड्यांचा मेंदुज्वराच्या आजाराने मृत्यू झाल्याची ह्दयद्रावक घटना घडल्यानंतर खळबळ उडाली होती. राज्याच्या वैद्यकिय पथकानेही या परिसरात येऊन पाहणी केली. गेल्या चार दिवसांपासून पालिकेचा वैद्यकिय आरोग्य विभागाने वाडेघर आणि गणेशवाडी परिसरातील घरांचे सर्वेक्षण करत आहे. यावेळी तेथील लहान मुलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. रक्ताचे नमुने पुण्यात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. लहान मुलांना ताप अथवा उलटी, मळमळ किंवा झटके येणे असे कोणतेही लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या महापालिका हॉस्पीटलमध्ये संपर्क साधावा व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्ताची चाचणी करून घ्यावी. तसेच घर व घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

हेही वाचा – ठाण्यात आढळला जखमी कासव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -