घरलाईफस्टाईलगाजरच्या ज्यूसचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे

गाजरच्या ज्यूसचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

Subscribe

फक्त डोळ्यांसाठीच नाही अन्य रोगांसाठी फायदेशीर

तूम्ही बऱ्याचदा अनेकांकडून ऐकले असेल की, आपल्या डोळ्यांकरिता गाजर हे चांगले असते. गाजर खाल्ल्याने फक्त डोळ्यांनाच फायदा होत नाही तर अनेक मोठे फायदे होतात. गाजराच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, ई, जी असतात. सेवन ल्यूकेमिया आणि पोटाच्या कँसरसाठी देखील फायदेशीर आहे.

- Advertisement -

गाजर हे फक्त गाजराचे लोणचे, गाजराचे हलवा आणि गाजराची कोशिंबीर करण्याकरिता जास्त करून वापरले जाते. गाजरचा ज्यूस देखील तितकाच चवदार असतो. विशेषकरून गाजरचा ज्यूस हेल्दी ड्रिंक म्हणून बरेच फायदे आहेत. ज्याप्रमाणे, गाजराच्या ज्यूस प्यायल्याने डोळ्याची दृष्टी वाढतेच मात्र, या व्यतिरिक्त महिलांना होणाऱ्या मासिक पाळीतील समस्यांही सोडवण्यास मदत करते.

- Advertisement -

गाजर ज्यूस पिण्याचे फायदे

  • शरीरात विषारी पदार्थ बाहेर काढण्यात गाजर मदत करते. गाजर खाल्ल्याने आपण दिर्घकाळ तरुण राहू शकतो. जर भूक लागत नसेल, खाण्याची इच्छा होत नसेल तर गाजरला लिंबू आणि मिठ लावून अदरक आणि पुदीन्यासोबत सेवन केल्याने भूक लागते.
  • गाजर ज्यूस प्यायल्याने रक्त साफ होते आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास ही गाजराचा ज्यूस मदत करतो. तसेच, गाजरचा ज्यूस नियमित प्यायल्याने कॅन्सरचा धोका उद्भवत नाही.
  • गाजरचा ज्यूसमध्ये बरेच पौष्टिक तत्त्वे असल्याने पचनप्रक्रिया निरोगी राहण्यास मदत होते. गाजरच्या ज्यूसमध्ये मीठ, कोथिंबीर, जिरं, मिरीपूड आणि लिंबाचा रस एकत्र करून प्यावा त्यामुळे पचनासंबंधित समस्या दूर होतात.
  • त्वचा, केस, नखे यांमध्ये असलेल्या समस्या देखील गाजरचा ज्यूस प्यायल्याने कमी होतात.
  • जर शरीरावर कोणताही भाग भाजला किंवा जळाला असेल तर त्यावर गाजरचा ज्यूस लावल्यास फायदेशीर ठरते. यासोबत महिलांना मासिक पाळीच्या काळात गाजरचा ज्यूस जास्त फायदेशीर ठरतो.

  • गाजरच्या ज्यूसमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटामिन ए असतो. ज्यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या दूर होतात. व्हिटामिन ए च्या भरपूर प्रमाणात असल्याने ज्यूस नियमित प्यावा. त्यामुळे सूर्याच्या किरणांपासून बचाव होतो.
  • गाजरचा ज्यूस गाळून पिऊ नये. त्यामुळे ज्यूसमध्ये असलेल्या फायबरचा ही शरीराला फायदा होतो. गाजरचा ज्यूस प्यायल्याने मूत्रसंबंधित समस्यांही होत नाहीत.
  • गाजरचा ज्यूस शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि वारंवार होणारी सर्दी आणि खोकल्यापासून शरीराला सुरक्षित ठेवतो.
  • गाजरामध्ये व्हिटामिन सी देखील आढळते. त्यामुळे संधिवाताची समस्या उद्भवत नाही.
  • गाजरामध्ये व्हिटामिन सीच्या प्रमाण भरपूर असलल्यामुळे गाजरचा ज्यूस दात बळकट होण्यास मदत करतो आणि हिरड्यामधून होणाऱ्या रक्तस्त्रावाची समस्या देखील दूर करतो.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -