घरमनोरंजनरजनीगंधा कोमेजली ,अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे निधन

रजनीगंधा कोमेजली ,अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे निधन

Subscribe

१९४७-२०१९

आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. जुहू येथील सीटीकेअर रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवासांपूर्वी प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. विद्या सिन्हा गेल्या काही वर्षांपासून फुप्फुसाच्या आजाराने, हृदयविकाराने त्रस्त होत्या. त्या ७२ वर्षाच्या होत्या.

सध्या स्टार प्रवाहवर सुरू असणार्‍या कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेत विद्या सिन्हा काम करत होत्या. ‘बेबे’ ही त्यांची भुमिका खूप गाजत होती. प्रकृतीच्या कारणास्तव गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी मालिकेतून एक्झिट घेतली होती. अभिनेत्री विद्या सिन्हा यांनी अनेक हिंदी चित्रपटात काम केली आहेत. छोटी सी बात, रजनीगंधा, पती पत्नी और वो या चित्रपटातील त्यांची भुमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

- Advertisement -

त्याचप्रमाणे अनेक हिंदी मालिकांमधूनही त्यांनी कामे केली. काव्यांजली, कबूल है, चंद्र नंदिनी, या मालिकांमधून त्यांनी भुमिका केल्या. तर अनेक वर्षांनंतर त्या सलमान खानच्या बॉडिगार्ड या चित्रपटामध्ये देखील त्यांनी भूमिका बजाविली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -