घरमहाराष्ट्रउद्यापासून आदित्य ठाकरे पूरग्रस्त भागातील दौऱ्यावर

उद्यापासून आदित्य ठाकरे पूरग्रस्त भागातील दौऱ्यावर

Subscribe

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा उद्या, १९ ऑगस्टपासून पूरग्रस्त भागात पहाणी आणि मदत दौरा सुरू होत आहे. दौऱ्याची सुरूवात उद्या सिंधुदूर्ग जिल्ह्यातून होणार असून २० ऑगस्ट रोजी ते पूरग्रस्त कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. तर २१ ऑगस्ट रोजी सांगली आणि कराड विभागातील पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे पूरग्रस्तांची भेट घेणार असून त्यांच्या पुनर्वसनासाठी मदतही करणार आहेत.

असा असेल दौरा

पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवार, १९ ऑगस्ट रोजी आदित्य ठाकरे हे मुंबईहून विमानाने गोव्याला रवाना होतील. त्यानंतर गोवा ते माणेरी, माणेरी ते सासोली, सासोली ते झोळंबे, झोळंबे ते असनिये, असनिये ते बांदा, बांदा ते दाबील, दाबील, शिरशींगे या ठिकाणांवर आदित्य ठाकरे भेट देणार आहेत. तर आंबोली येथे ते सोमवारी रात्री मुक्काम करतील. मंगळवार, २० ऑगस्ट रोजी ते कोल्हापूरच्या दिशेने रवाना होती. आंबोली ते कोवाड, कोवाड ते कागल आणि कागल ते कोल्हापूर असा त्यांचा प्रवास असणार आहे. तर मंगळवारी रात्री ते कोल्हापूर येथे मुक्काम करणार आहेत. त्यांनतर तिसऱ्या आणि अखेरच्या दिवशी म्हणजेच २१ ऑगस्टला ते कोल्हापूर ते सांगली (जयसिंगपूर मार्गे) जाऊन हरीरोड, गावभाग, सांगली येथे पाहणी दौरा करणार आहेत. त्यानंतर ब्रम्हनाळ ते वाळवा या मार्गावर वाळवा-अंकलखोप ते वाळवा नदी मार्गावरील बाधित क्षेत्राची पाहणी करून तेथील पत्रकारांशी संवाद साधतील. पुढे वाळवा ते ईश्वरपूर (कराड), ईश्वरपूर ते कराड शहर आणि तिथून मुंबई असा प्रवास करत दौरा संपवणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -