घरक्रीडाअभिजीत, संगीताला जेतेपद

अभिजीत, संगीताला जेतेपद

Subscribe

राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

अभिजीत त्रीपणकर आणि संगीत चांदोरकर यांनी पुणे येथे झालेल्या उत्कर्ष स्पोर्ट्स अकादमी राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरी गटाचे जेतेपद पटकावले. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अभिजीत त्रीपणकरने मुंबईच्या माजी राष्ट्रीय विजेत्या संदीप देवरूखकरला २०-१९, ९-२५, २५-० असे पराभूत केले.

पहिल्या दोन सेटनंतर १-१ अशी बरोबरी होती. तिसर्‍या आणि निर्णायक सेटमध्ये मात्र अभिजीतने उत्कृष्ट खेळ केला. त्याने हा सेट २५-० असा जिंकत हा सामनाही जिंकला. त्याआधी उपांत्य फेरीत अभिजीतने मुंबईच्या पंकज पवारवर १२-११, १८-१७ अशी, तर संदीपने अभिषेक चव्हाणवर २३-१७, १७-२३, २०-१५ अशी मात केली होती. तिसर्‍या क्रमांकाच्या लढतीत पंकज पवारने अभिषेक चव्हाणवर २४-६, १०-२५, २५-९ असा विजय मिळवला.

- Advertisement -

महिला एकेरीचा अंतिम सामना पुण्याची पुष्कर्णी भट्टड आणि माजी राष्ट्रीय विजेती संगीता चांदोरकर यांच्यात झाला. या सामन्यात संगीताने २-२५, २५-०, १७-१४ अशी बाजी मारली. महिलांमध्ये तिसर्‍या क्रमांक मुंबईच्या निलम घोडकेने मिळवला. तिने मुंबईच्या उर्मिला शेंडगेवर २१-४, २४-० अशी मात केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -