घरमुंबईअनधिकृत बांधकामप्रकरणी प्रियांकाला पालिकेची नोटीस

अनधिकृत बांधकामप्रकरणी प्रियांकाला पालिकेची नोटीस

Subscribe

अंधेरी पश्चिम येथील ओशिवरा परिसरात अनाधिकृतपणे बांधकाम केल्यामुळे रहिवाशांनी केली तक्रार.

अंधेरी पश्चिम येथील अनाधिकृतरित्या कार्यालयाचे बांधकाम केल्याप्रकरणी पालिका अधिकाऱयांनी अभिनेत्री प्रियांका चोप्राला नुकतीच नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता आपल्या परदेशी बॉयफ्रेंडमुळे चर्चेचा विषय ठरलेली प्रियांका पुन्हा वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. प्रियांका सध्या शुटिंगसाठी न्यूयॉर्क येथे गेली आहे. यासाठी ही नोटीस तीच्या घरी पाठवण्यात आली. ओशिवरा परिसरात असलेल्या आपल्या कार्यालयात अनाधिकृत बांधकाम केल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी कपील शर्मा आणि शाहरुख खान यांनाही अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी महानगर पालिकेने नोटीसा बजावल्या होत्या.

काय आहे प्रकरण?

- Advertisement -

अंधेरी पश्चिम येथील ओशिवरा परिसरातील एका व्यवसायीक इमारतीत प्रियांकाच्या मालकीचा गाळा आहे. प्रियांकाने हा गाळा ‘करिश्मा ब्युटी पार्लर आणि स्पा’ला भाडेतत्वावर दिला होता. या जागेवर अनाधिकृतपणे बांधकाम करण्यात आले होते. काही ठिकाणी आगाऊ बांधकाम असल्यामुळे येथील रहिवाशांनी याची तक्रार पालिकेकडे केली. तक्रार मिळाल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी बांधकामाचे निरिक्षण केले असता अनाधिकृत बांधकाम झाले असल्याचे आढळून आले. याबाबत मॅनेजरला विचारणा केली असता त्याने प्रियांका चोप्राशी जागेसाठी करार असल्याचे सांगितले. पालिका अधिकाऱयांनी मालक आणि भाडेकरु दोघांनाही कारवाई करण्यासंबधीत नोटीसा बजावल्या आहेत. नोटीसअंतर्गत अनाधिकृत बांधकाम तोडण्यासाठी एका महिन्याची मुदत देण्यात आली आहे. असे न केल्यास बांधकामावर तोडक कारवाई करुन दंड आकारला जाणार असल्याचे लिहिले आहे.

“कोणतीही परवानगी न घेता गाळ्याचे प्लाय आणि काच लावून विभाजन करण्यात आले आहे. अनाधिकृत बांधकाम त्वरीत हटवण्याचे आदेश त्यांना देण्यात आलेले आहेत. या आदेशाकडे दूर्लक्ष केल्यास महाराष्ट्र प्रादेशिक नगर नियोजन कायद्याअंतर्गत दंड आकारुन तोडक कारवाई केली जाईल” – पालिका अधिकारी 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -