घरमुंबईपूरग्रस्त एसटी कर्मचार्‍यांना मदत करा

पूरग्रस्त एसटी कर्मचार्‍यांना मदत करा

Subscribe

एसटी कामगार संघटनेची प्रशासनाकडे मागणी

कोल्हापूर, सांगली आणि सातारामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागले. या नैसर्गिक आपत्तीमध्ये एसटी महामंडळाच्या तिन्ही विभागांतील एसटी कर्मचार्‍यांना मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत एसटी महामंडळाने कर्मचार्‍यांना कसलीही मदत केली नाही, उलट रजेचे अर्ज टाकायला सांगितले. एसटीच्या मान्यता प्राप्त एसटी कामगार संघटनेने या नैसर्गिक आपत्तीमध्ये पीडित एसटी कर्मचार्‍यांना 3 महिन्यांचे अग्रीम वेतन, विशेष रजा व हजेरी देण्याची मागणी महामंडळाकडे केली आहे.

५ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा याठिकाणी पूरपरिस्थिती उद्भवलेली होती. नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वांचाच नाईलाज झाला होता. शिवाय बर्‍याच एसटी कर्मचार्‍यांचे कुटुंबीयही पुरामध्ये फसले होते.अनेकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.अशा परिस्थितीत एसटी महामंडळाने पूरग्रस्त एसटी कर्मचार्‍यांना पाठबळ देण्याऐवजी सरसकट ५ ते १२ ऑगस्ट या कालावधीत कर्मचार्‍यांना रजेचे अर्ज टाकायला सांगितले आहेत. मात्र, अशा नैसर्गिक परिस्थितीत एसटीच्या कर्मचार्‍यांना मुळ वेतन अधिक महागाई भत्ता मिळून तीन महिन्यांंचे अग्रीम वेतन देण्याची तरतूद असताना एसटी महामंडळाकडून अशा पूरग्रस्त एसटी कर्मचार्‍यांकडे दुर्लक्ष केले. या संबंधीचे वृत्त दैनिक ‘आपलं महानगर’ने प्रकशित केले होते. त्यानंतर अनेक एसटी कर्मचारी संघटनांनी हा मुद्दा उचलून धरला आहे.

- Advertisement -

पूरपरिस्थितीमध्ये अनेक आगार बंद पडले होते. त्यामुळे एसटी कर्मचार्‍यांना कामावर रूजू होता आले नाही. पूरपरिस्थितीमुळे एसटीची सेवा ठप्प झाली होती. म्हणून एसटीचा सुमारे 100 कोटींचा तोटा झाल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले होते. मात्र,यातील पूरग्रस्त कर्मचार्‍यांना अद्याप एसटी प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याने,अशा कर्मचार्‍यांना तीन महिन्यांचे बिनव्याजी अग्रीम वेतन आणि पगारी रजा देण्याची मागणी केली. एसटीच्या मान्यता प्राप्त एसटी कामगार संघटनेने केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -