घरमुंबईठाणे-पनवेल प्रवास होणार कूल

ठाणे-पनवेल प्रवास होणार कूल

Subscribe

मुंबईत दाखल झालेली चौथी लोकल ट्रान्सहार्बर मार्गावर चालवण्याचे प्रशासनाचे नियोजन

मध्य रेल्वेवरील पहिली-वहिली एसी लोकल ठाणे ते पनवेल या ट्रान्सहार्बर मार्गावर चालवण्यात येणार आहे. वर्षाच्या शेवटपर्यंत या मार्गावर एसी लोकल सुरू करण्याचे आदेश रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी मध्य रेल्वेला दिले आहेत.

या मार्गावर एसी लोकल चालवण्याचे कारण…

ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आता ती संख्या वाढून दिवसाला चार लाखांवर गेली आहे. तसेच या मार्गावर उद्योगांची संख्या जास्त असल्याने या मार्गावर एसी लोकल चालवण्याचे नियोजन केले जात आहे. याच पार्श्वभमीवर रेल्वमंत्र्यांनी याच मार्गावर ४ ते ५ एसी लोकल चालवण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे या मार्गावर डिसेंबरपर्यंत एसी लोकल सुरू करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे.

- Advertisement -

मुंबईच्या उपनगरी रेल्वेला मिळणाऱ्या १२ एसी लोकलपैकी मध्य आणि पश्चिम रेल्वेला प्रत्येकी ६ गाड्या देण्यात येणार आहे. १२ पैकी ३ एसी लोकल प.रेल्वेला मिळाल्या त्यामुळे मुंबईत दाखल झालेली चौथी लोकल ट्रान्सहार्बर मार्गावर चालवण्याचे नियोजन प्रशासन करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -