घरमहाराष्ट्रनाशिकलाखोंच्या उपस्थितीत वाढीव आरक्षणासाठी वंजारी समाजाचा उद्या मोर्चा

लाखोंच्या उपस्थितीत वाढीव आरक्षणासाठी वंजारी समाजाचा उद्या मोर्चा

Subscribe

अनेक मागण्यांसह बुधवारी धडकणार जिल्हाधिकारी कार्यालयावर

वंजारी समाजाला सात टक्के वाढीव आरक्षण मिळावे, या मागणीसाठी एकटवलेल्या वंजारी समाजाकडून बुधवारी (दि.11) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून, अगदी शातंतेच्या मार्गाने मोर्चा काढला जाणार आहे. मोर्चात लाखो समाजबांधव सहभागी होण्याचा दावा आरक्षण कृती समितीने केला आहे.

आरक्षण कृती समितीच्यावतीने बुधवारी सकाळी 11 वाजता क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेतून हा मोर्चा निघेल. मोर्चाच्या नियोजनासाठी तरूणांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक मोर्चाच्या सुरूवातीस राहणार असून, मोर्चाची गर्दी नियंत्रणात आणण्याचे काम करणार आहे. मोर्चाच्या प्रारंभी वयोवृध्द पुरूष, महिला त्यानंतर तरूणी, तरूणींच्या पाठोपाठ महिला त्यानंतर तरूण, पुरूष आणि मोर्चाच्या शेवटी सर्व नेते, पुढारी असणार आहेत. आरक्षण कृती समितीच्यावतीने मोर्चाची तयारी करण्यात आली आहे. यासाठी समितीच्यावतीने प्रत्येक तालुका गावागावांत बैठका घेण्यात आल्या. बैठका, मेळाव्यांचा प्रतिसाद बघता, मोर्चाला लाखोंची गर्दी होणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. मोर्चात समाजबांधवांनी सहभागी होण्याची आवाहन आरक्षण कृती समितीने केले आहे.

- Advertisement -

असा निघेल मोर्चा

क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या प्रागंणात सकाळी 11 वाजता समाजबांधव एकत्र होतील. महाविद्यालयाच्या प्रांगणात जमा झालेल्या समुदायास पाच कन्या मोर्चाची पार्श्वभूमी विशद करतील. त्यानंतर, 12 वाजता नाईक महाविद्यालयापासून मोर्चाला सुरूवात होईल. कॅनडा कॉर्नर, राजीव गांधी भवन, पंडीत कॉलनी मार्गे गंगापूर रोडमार्गे मोर्चा डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर येईल. मोर्चाच्यावतीने पाच जणांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन देतील.

या आहेत समाजाच्या मागण्या

1) जातनिहाय जगगणना करावी.
2) लोकसंख्येच्या प्रमाणात वाढीव 10 टक्के आरक्षण द्यावे.
3) उद्योग-व्यवसायासाठी शासनाने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करावे
4) विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय शासकीय वसतीगृहाची उभारणी करावी
5) (स्व.) गोपीनाथ मुंडे महामंडळाची स्थापना करावी.
6) वंजारी समाज भवनासाठी मुंबईत जागा उपलब्ध करावी
7) समाजातील विद्यार्थ्यासाठी आश्रमशाळेतील भत्यामध्ये वाढ करावी
8) एनटी ड भटक्या जमातीसाठी असलेली नॉनिक्रमिलिएरची अट रद्द करावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -