घरमुंबईविधानसभा निवडणूक लढण्याबाबत मनसेचे तळ्यात - मळ्यात

विधानसभा निवडणूक लढण्याबाबत मनसेचे तळ्यात – मळ्यात

Subscribe

आगामी विधानसभा निवडणुक लढवणार की नाही याविषयी मनसे संभ्रमात पडली आहे.

विधानसभा निवडणूक लढवायची की नाही यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना संभ्रमात पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसेने २०१९ मधील लोकसभा निवडणूकही लढवली नव्हती. मात्र, विधानसभा निवडणुक लढवणार का याकडे सर्वांचे लक्ष रागून राहिले आहे. तसेत हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आगामी विधानसभा लढवायची कि नाही यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी एक बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणूक लढवायची की नाही यावर चर्चा झाली आहे. मात्र, निर्णय काय झाला ते जाहीर करण्यात आलेले नाही. योग्य वेळी राज ठाकरे निर्णय जाहीर करतील असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले बाळा नांदगावकर?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठकीत निवडणूक लढवायची की नाही याबाबत नेत्यांची मते जाणून घेतली आहेत. यामध्ये काही नेत्यांनी निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे. तर काहींनी मात्र, या निर्णयाला नकार दिला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे नेमका कोणता निर्णय घेणार? त्यांची नेमकी काय भूमिका असणार हे पाहावे लागणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच जाहीर करतील, असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ए्बीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

- Advertisement -

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत न उतरताही प्रचारात चांगलीच रंगत भरली होती. राज ठाकरेंनी दहा सभा घेऊन मोदी आणि भाजपच्या जाहीरातबाजीचे व्हिडिओ सभांमधून दाखवले होते. ‘लाव रे तो व्हिडिओ’ असे शब्द राज ठाकरेंच्या तोंडून बाहेर पडले की सत्ताधाऱ्यांना धडकी भरावी, एवढी दहशत या शब्दांनी निर्माण केली होती. लोकांनीही राज ठाकरेंच्या या व्हिडिओंना भरभरून प्रतिसाद दिला. मात्र प्रत्यक्षात या सभांचा काहीही परिणाम झाला नाही हे लोकसभा निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक निकालाबाबत ‘अनाकलनीय’ अशी एका शब्दाची प्रतिक्रियाही दिली. आता विधानसभा निवडणूक मनसे लढवणार की नाही याबाबत मनसेच्या नेत्यांमध्ये संभ्रम असल्याचे समजते आहे.


हेही वाचा –  गड-किल्ल्यांपेक्षा तुमच्या मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्या – राज ठाकरे

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -