घरमुंबईनेरुळमध्ये विसर्जन मिरवणुकीत विजेचा धक्का

नेरुळमध्ये विसर्जन मिरवणुकीत विजेचा धक्का

Subscribe

सात कार्यकर्ते अत्यवस्थ,तिघांची प्रकृती गंभीर

सिवूडचा महाराजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेशमूर्तीची अनंत चतुर्दशीला विसर्जन मिरवणूक निघाली होती. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही मिरवणूक नेरुळ येथील उड्डाणपुलाजवळ आली. त्यावेळी उड्डाणपुलावरून खाली उतरल्यावर उंच मूर्ती विजेचा उच्च दाब असलेल्या वरील वीजतारेच्या संपर्कात आली. त्यामुळे वीजप्रवाह मूर्तीच्या प्रभावळीत असलेल्या लोखंडी सळयांमधून उतरल्याने मूर्तीजवळ असलेल्या सात कार्यकर्त्यांना विजेचा धक्का बसला. यामुळे हे कार्यकर्ते जखमी झाले. त्यांना नेरुळ येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या पैकी तीन कार्यकर्त्यांची स्थिती गंभीर असून चार कार्यकर्त्यांवर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

ही मूर्ती २२ फूट उंच होती. त्यामागे प्रभावळ होती. ही प्रभावळ आणि त्यामधील लोखंडाचे सळया खांबावरील वीजतारांच्या संपर्कात आल्याने स्फोट झाला. या घटनेतील जखमी सागर वाल्मीकी यांना डी.वाय. पाटील हॉस्पीटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. 22 फुटांची मूर्ती बसवताना मंडळाने नियमांचे उल्लंघन केले असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी वाल्मीकी यांच्या नातेवाईकांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -