घरमुंबईयंदा जितेंद्र आव्हाडांना कुणाचे आव्हान ...

यंदा जितेंद्र आव्हाडांना कुणाचे आव्हान …

Subscribe

वेध मतदार संघाचा ....मुंब्रा कळवा विधानसभा

कळवा- मुंब्रा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. २००९ पासून जितेंद्र आव्हाड हे आमदार म्हणून निवडून येत आहेत. २०१४ च्या मोदी लाटेत राष्ट्रवादीचे अनेक गड ढासळले, पण आव्हाड ४७ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आले. २०१९ च्या लेाकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या उमेदवाराने सर्वाधिक मते पटकावली आहेत. त्यामुळे हा राष्ट्रवादीचा सेफ मतदार संघ म्हणूनच ओळखला जातो. शिवसेना- भाजप युतीबाबत एक दोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा आव्हाडांना कुणाचे आव्हान असणार आहे हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

कळवा मुंब्रा हा परिसर ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात मोडत असला तरी सुध्दा कल्याण लोकसभा क्षेत्रात येतो. कळव्यात आगरी आणि कोळी बांधव तर मुंब्रा कौसा भागात मुस्लीम वस्ती मोठ्या प्रमाणात आहेत. हे दोन्ही समाज ज्याच्या बाजूने उभे ठाकतात तोच उमेदवार निवडून येतो. आव्हाड यांनी या विभागात भरीव काम केले आहे. नवनवीन संकल्पना राबविल्या म्हणूनच की काय २०१४ च्या मोदी लाटेतही आव्हाड ४७ हजार ६८३ मतांनी विजयी झाले. तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला १० हजाराचा लीड मिळाला. मागील निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. मात्र आव्हाड यांना पराभूत करण्याची रणनीती सेना भाजपकडून आखली जात आहे.

- Advertisement -

मागील निवडणुकीत शिवसेनेने दशरथ पाटील आणि भाजपचे अशोक भोईर या भूमीपुत्रांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. मात्र सेना भाजपची मते एकत्रीत केली तरी सुध्दा आव्हाड यांचे मते त्याहून अधिक होत आहेत. त्यामुळे आव्हाडांचे प्राबल्य दिसून येते. मुंब्रा येथे मुस्लीम समाज असल्याने एमआयएमचा प्रभाव आहे. मागील वेळेस एमआयएमचा उमेदवार तिसर्‍या क्रमांकावर होता. यंदा वंचित आघाडीकडून एमआयएमचा उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मात्र मतांची विभागली गेल्यास आव्हाड यांचे मताधिक्य कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्यंतरी राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाटयावर आले होते. आव्हाडांच्या एकाधिकारशाहीची तक्रारही थेट पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याकडे एका गटाने केली होती.

मात्र ही नाराजी शांत करण्यात आव्हाड यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. आव्हाडांचा पराभव करण्यासाठी भाजपने फिल्डींग लावली आहे. मात्र युती झाल्यास हा मतदार संघ कोणाच्या वाट्याला सुटतो, याकडेही पक्षाच्या कार्यकत्यांचे लक्ष आहे. जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे यांचे मैत्रीपूर्ण संबंध हे सर्वांनाच ज्ञात आहे. त्यामुळे आव्हाडांसमोर यंदा शिवसेना की भाजप कोणता उमेदवार असणार हेच पाहावे लागणार आहे.

- Advertisement -

प्रमुख समस्या

कळवा आणि मुंब्रा दोन्ही शहरांत वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. मुंब्यात वीजेची समस्या आहे. काही भागात पावसाचे पाणी साचते, तसेच जागोजागी पसरलेला कचर्‍यामुळे अस्वच्छता, कळवा डोंगरावर झोपड्यांचे साम्राज्य, बेकायदा बांधकामांचा प्रश्न आहे. मुंब्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटना आदी समस्या आहेत.

आकडेवारी :

एकूण मतदार : ३, ४८, ४८२
पुरूष मतदार : १, ८५,७४९
महिला मतदार : १, ५२, ५९३

२०१४ ची विधानसभेतील मते

जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस) : ८६, ५३३
दशरथ पाटील (शिवसेना) ; ३८, ८५०
अशोक भोईर (भाजप) : १२, ८१८
यासीन कुरेशी (काँग्रेस) : ३८४७

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -