घरक्रीडाअश्विन-जाडेजावर दबाव टाकणे गरजेचे!

अश्विन-जाडेजावर दबाव टाकणे गरजेचे!

Subscribe

डू प्लेसिसचे मत

भारताच्या रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजा यांनी विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. अश्विनने या सामन्यात ८, तर जाडेजाने ६ गडी बाद केले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला कसोटी मालिकेत पुनरागमन करायचे असल्यास या दोघांवर दबाव टाकणे गरजेचे आहे, असे कर्णधार फॅफ डू प्लेसिसला वाटते.

भारतामधील परिस्थिती फिरकीपटूंना अनुकूल असते. त्यामुळे फलंदाज त्यांच्याविरुद्ध सावधपणे खेळण्याचा प्रयत्न करतात. मात्र, याचा फायदा फिरकीपटूंनाच होतो. फलंदाजांनी फिरकीपटूंविरुद्ध धावा करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असते. तुम्ही सकारात्मक फलंदाजी करत असल्यास त्यांच्यावर दडपण येते. अश्विन आणि जाडेजा यांनी भारतमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर दबाव टाकणे गरजेचे आहे. आम्ही त्यांना हवी तशी गोलंदाजी करू दिली, तर ते नक्कीच आम्हाला अडचणीत टाकतील. आशियात खेळताना आक्रमण आणि बचाव यात समतोल राखणे आवश्यक असते, असे डू प्लेसिस म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -