घरमुंबईसर आली धावून,सभा गेली वाहून

सर आली धावून,सभा गेली वाहून

Subscribe

पावसामुळे निवडणूक प्रचारावर पाणी

विधानसभा निवडणूक अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी प्रत्येक दिवस महत्त्वाचा बनला असताना अचानकपणे राज्यात काही ठिकाणी पावसाचे अधूनमधून आगमन होऊ लागले आहे. २ ते ३ तासांत मुसळधार पाऊस पडल्यानंतर अवघे शहर जलमय होत ेअसल्याने उमेदवारांची प्रचाराच्या दरम्यान गैरसोय होत आहे. डोकेदुखी बनलेला पाऊस उमेदवारांसाठी आव्हान बनला आहे.

बुधवारी, ९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यातून मनसेच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ करणार होते. मोठ्या अथक प्रयत्नातून मनसेला या सभेसाठी मैदान मिळाले होते. मात्र प्रचारसभेच्या दिवशीच मुसळधार पाऊस कोसळू लागल्याने पुण्यात काही तासात रस्ते आणि वस्त्या जलमय झाल्या. त्याप्रमाणे ज्या मैदानावर राज ठाकरे यांची सभा होणार होती, त्या मैदानात पाणी जमले होते. त्यामुळे मैदानात सर्वत्र चिखल झाला होता.

- Advertisement -

अशा परिस्थितीतही मनसेच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून मैदानावरील पाणी आणि चिखल काढण्याचा सपाटा लावला, मैदान सुकवण्याा प्रयत्न केला, परंतु संध्याकाळी जेव्हा सभेची वेळ झाली, तेव्हा पुन्हा मुसळधार पाऊस आला आणि पावसाने मैदानाची अवस्था पुन्हा वाईट केली. त्यामुळे अखेरीस राज ठाकरे यांना त्यांची प्रचारसभा रद्द करावी लागली. अशा प्रकारे पुण्यातील अतिशय महत्त्वाच्या ठिकाणाकडील प्रचारसभा रहित झाल्याने मनसेला फटका बसला.

दिग्गजांच्या सभांना चिंता

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ 10 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असून उमेदवारांसाठी एक एक दिवस महत्वाचा आहे. मात्र, रोज येणार्‍या पावसामुळे उमेदवारांची पंचाईत झाली आहे. एका तासाच्या पावसाचे पाणी सर्वत्र तुंबते. वीज जाते. अशावेळी घरोघरी प्रचार कसा करावा? या चिंतेमध्ये सर्व उमेदवार आहेत. येत्या काही दिवसांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, अजित पवार यांच्या जाहीर सभा होणार आहेत. तेव्हा देखील पाऊस कोसळणार की काय, अशी भीती उमेदवारांनी व्यक्त केली जात आहे. 19 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजता प्रचार संपणार आहे. 21 ऑक्टोबरला मतदान तर, 24 ऑक्टोबर ला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, हवामान खात्याने आणखी काही दिवस पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -