घरमहाराष्ट्रअब की बार २२२ पार; भाजप प्रवक्त्या श्वेता शालिनींचा विश्वास

अब की बार २२२ पार; भाजप प्रवक्त्या श्वेता शालिनींचा विश्वास

Subscribe

'आजपर्यंत महाराष्ट्राचा २२२ जागांचा रेकॉर्ड राहिला आहे. कोणत्याही पक्षाच्या जागा २२२ पेक्षा जास्त निवडून आलेल्या नाहीत. हा रेकॉर्ड आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तोडणार आहोत. त्यामुळे बहुमताने आमची सरकार आणणार आहोत आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून परतणार आहेत', असा दावा भाजपच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी केला. 'आपलं महानगर'च्या 'खुल्लम खुल्ला' या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

राष्ट्रकवी रामधारी सिंह ‘दिनकर’ यांच्या ‘शक्ती या सौंदर्या’ या हिंदी कवितेच्या ओव्यांपासून शालिनी यांनी आपल्या मुलाखतीला सुरुवात केली. ‘मुखावर खरे तेज आणायचे असेल तर असे काम करा की त्या कामांमुळे भरपूर वर्ष लोकांच्या स्मरणात तुम्ही रहाल. याच विचारांवरुन मी माझ्या आयुष्याची सुरुवात केली’, असे भाजपच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी म्हणाल्या. श्वेता शालिनी यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी राहिलेला आहे. त्यांचा जन्म बिहारमध्ये झाला. लग्नानंतर त्या काही वर्ष उत्तर प्रदेशात राहिल्या त्यानंतर त्या मुंबईत वास्तव्यास आल्या. गेल्या वीस वर्षांपासून त्या मुंबईत स्थायिक झाल्या आहेत. त्या सॉफ्टेवेअर इंजिनिअर आहेत. मुंबईत त्यांनी स्वत:ची टेलीकॉम कंपनी सुरु केली. या कंपनीत आजच्या घडीला सुमारे तीन हजार कर्मचारी काम करत आहेत. व्यासायासोबतच त्यांनी आता महाराष्ट्रातील राजकारणातही चांगला जम बसवला आहे. २००८ साली त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये काम करत आहेत. त्यानंतर आज त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पक्षासाठी काम करत आहेत.

राजकारणात का आलात?

माझ्या मनात मी उद्योजिका किंवा राजकारणी बनावी, असा माझा उद्देशच नव्हता. माझ्या कामांमधून जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळावा, असा माझा उद्देश होता. माझ्या मनात एक विचार आला. आज मी तीन हजार लोकांची कंपनी चालवत आहे. तीन हजार लोक म्हणजे एका घरात जवळपास ४ जण असतील तर १२ हजार लोकांना माझी मदत होत असेल. याच १२ हजारांचे उद्या ५० हजार किंवा त्याहीपेक्षा जास्त लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. मात्र, जेव्हा मी एक पॉलिसी लागू केली तर त्याचा फायदा लाखो लोकांना होऊ शकतो. जर मला लाखो-कोट्यवधी मुलांचे भविष्य घडवायचे असेल तर माझ्या हातात सत्ता असली पाहिजे. पॉलिटिक्स हा शब्द पॉलिसी शब्दातून निर्माण झाला आहे. एकच पॉलिसी लाखो लोकांचे भले करु शकते. मी देवेंद्र फडणवीस यांना गुरु मानते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे प्रेरणास्थान आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मला एक खुप चांगली गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले की, दुरुन हे चुकीचे आहे किंवा ते चुकीचे आहे असे म्हणणे खुप सोपे आहे. जर खरच बदल घडवायचा असेल तर तुम्हाला चिखलात उतरावे लागेल. तरच चिखलात कमळ फुलेल. त्यामुळेच मी राजकारणात उतरली. जर बदल घडवायचा असेल तर बदलाची सुरुवात माझ्यापासून व्हायला हवी. माझे हे विचार राजनैतिक परिवर्तन करु शकतात.

- Advertisement -

#Live : भाजपच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी लाईव्ह

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 14, 2019

 

- Advertisement -

शरद पवारांसाठी संपूर्ण भाजपची टीम महाराष्ट्रात का उतरली?

तुम्ही चुकीचे समजत आहात. एक वेळ होती, जेव्हा आम्हाला विचारले जायचे की, तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे? नेतृत्व कुठे आहे ते सांगा. आज आमच्याजवळ वैश्विक नेतृत्व आहे. आज आमच्याजवळ निती आहे. नियत आणि नियम आहेत. सगळ्या गोष्ट आहेत आणि त्याच आधारे सर्व ज्येष्ठ नेतेमंडळी काम करत आहेत. लोकांना आम्ही गृहित धरलेले नाही आहे. आम्ही जनतेचे सेवक आहोत. लोकांकडे जाऊन लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आम्ही जाणून घेतो. आज आमच्या जवळ नियम, निती आणि नेतृत्व आहे. तुम्ही कोणत्याही विरोधकाकडे पहा, त्यांचे माजी पक्षाध्यक्ष पळून गेले तर त्यांच्याकडे नेतृत्वच शिल्लक राहिले नाही. काल राहुल गांधी मुंबईत आले ते कोर्टाची बेल घ्यायला आले होते. बेल घ्यायला आले तर त्यांनी विचार केला आलोच आहोत तर दोन सभा घेऊन घेऊ. तर त्यांच्याकडे नेतृत्व अशाप्रकारचे आहे. त्यांच्याकडे नियमच नाहीत. जर त्यांच्याजवळ काहीच नाही तर ते काय करु शकतात? त्यामुळे ते काहीच करताना दिसत नाहीत. दुसरीकडे शरद पवारांची बाबतीत बोलायचे झाले तर ते राजकारणातील मोठी हस्ती आहेत. मात्र, हे माझे वैयक्तीक मत आहे की, ते अत्यंत खालच्या पातळीवर राजकारण करत आहेत.

नरेंद्र मोदी आणि अमित शहा कलम ३७० वरच का बोलत आहेत?

तुम्ही अमित शहांचे किंवा मुख्यमंत्र्यांचे भाषण बघा. ते ३० मिनिटे भाषण करतात. त्यापैकी २५ मिनिटे ते विकासाच्या मुद्द्यांवर बोलतात आणि ५ मिनिटे ते कलम ३७० आणि तीन तलाक या विषयांवर बोलतात. पण लोकांना विकासा संदर्भात बोललेले दिसत नाही. तुम्ही अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांचे भाषण बघा. आम्ही एकमात्र असे सरकार आहोत ज्यांनी आपल्या कामांचा तपशील दिला आहे. याशिवाय किती गर्वाची बाब आहे की, संपूर्ण भारतात आपला तिरंगा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी फडकवला गेला. त्याचबरोबर आम्ही शेतकऱ्यांसाठी ५० हजार कोटी रुपये खर्च केले. ग्रामीण भागात रस्ते बनवण्यासाठी आम्ही ३० हजार कोटी रुपये खर्च केले.

तरीही शेतकरी आत्महत्या का करत आहेत?

१५ वर्षांचे दुष्कर्म पाच वर्षात भरुन निघणार नाही. जिथे सिंचन आहे तिथे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली नाही. आज आम्ही जलयुक्ती शिवार योजनेच्या मार्फत १८ हजार गावांना पाणी दिले. लातूरला टॅंकरमुक्त केले. बदल होत आहे, मात्र त्याला थोडा वेळ लागणार.

शिवसेना आणि भाजपचा वेगळा जाहीरनामा का?

शिवसेनेचा जाहीरनामा हा त्यांच्या विचारांचा आहे. आमचा जाहीरनामा हा आमच्या पक्षाच्या विचारसरणीचा आहे. परंतु, जेव्हा युतीचे सरकार येईल तेव्हा आमचे एकमत होईल.

आरेत फिल्मसिटी बनली तेव्हा त्याला का नाही विरोध केला?

आरे कारशेडसाठी आम्ही एक कमिटी बनावली. त्या कमिटीने ठरवले की कारशेड कुठे बनवले पाहिजे. ती जमिन सरकारची आहे. काही लोकांचा त्या जागेवर काही पैशांचा फायदा आहे. जर आम्ही दुसऱ्या जागेवर कारशेड बनवले तर साडे पाच हजार कोटी रुपयांचा खर्च होईल. आरेमध्ये फिल्मसिटी बनली तेव्हा त्याला का नाही विरोध केला? सर्वसामान्य मेट्रोला विरोध करत नाहीत. दररोज सात जणांचा लोकलमध्ये मृत्यू होत आहे. त्यामुळे मेट्रो जरुरीची आहे.

महाराष्ट्रात किती युवकांना तुम्ही रोजगार दिला?

गेल्या पाच वर्षांत सर्वात जास्त रोजगार महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. देशात एकूण टक्केवारीत महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे २६ टक्के रोजगार निर्माण झाला. आम्ही जलयुक्त शिवार योजना राबवली. त्यामुळे ६.६ टक्के वाढ शेतीत झाली आहे. ७.९ टक्के इंडस्ट्रीमध्ये रोजगार निर्माण झाले आहेत. सर्वाधिक मुद्रा लोन इथे गेले आहेत.

भाजपने या निवडणुकीत अनेक ज्येष्ठ नेत्यांना का वगळले?

माझ्या मागेपुढे राजकारणात कुणी नाही. माझा पक्ष हा लोकशाहीच्या नितीमुल्यांवर चालणारा पक्ष आहे. नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठी आम्ही वरिष्ठांच्या उमेदवारी दिली गेली नाही. वरिष्ठांना दुसरी जबाबदारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -