घरदेश-विदेशINX Media Case : तिहार जेलमध्ये पी. चिदंबरम यांची ईडीकडून चौकशी, अटक

INX Media Case : तिहार जेलमध्ये पी. चिदंबरम यांची ईडीकडून चौकशी, अटक

Subscribe

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) ने आज चौकशी करुन त्यांना अटक केली आहे.

मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी तिहार जेलमध्ये असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) ने आज चौकशी करुन त्यांना अटक केली आहे. तिहार जेलमध्येच ही चौकशी करण्यात आली. जवळपास एक तास ही चौकशी सुरु होती. मंगळवारी विशेष न्यायालयाने ईडीला पी. चिदंबरम यांची चौकशी तसेच अटकेची परवानगी दिली होती. दरम्यान चिदंबरम यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी जामीन याचिका दाखल केली आहे.

विशेष न्यायालयाची परवानगी मिळताच ईडीचं पथक तिहार जेलमध्ये दाखल झालं. या ठिकाणी जवळपास एक तास पी. चिदंबरम यांची चौकशी करण्यात आली. यावेळी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम आई नलिनसोबत तिहार जेलमध्ये पोहोचले. दरम्यान ईडीने पी. चिदंबरम यांच्या अटकेची मागणी केली होती. यावर न्यायालयाने त्यांना चौकशी दरम्यान हाती लागलेल्या माहितीच्या आधारे पी. चिदंबरम यांना अटक करण्याची परवानगी दिली.

- Advertisement -

वडिलांना भेटल्यानंतर काय म्हणाले कार्ती चिदंबरम?

आज मी माझ्या वडिलांची भेट घेण्यासाठी आलो होतो. ते व्यवस्थित आहेत. हे जे काही सुरु आहे. हे सगळं राजकीय षडयंत्राचा भाग आहे. एवढेच नाही तर हा सर्व तपास बोगस असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सीबीआय अपमान करण्याचा प्रयत्न करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -