घरदेश-विदेशमोठा भाऊ आयपीएस तर छोटा दहशतवादी!

मोठा भाऊ आयपीएस तर छोटा दहशतवादी!

Subscribe

काश्मीर खोऱ्यातील तरुणांचा दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी होण्याचे प्रमाण वाढले. एका आयपीएस अधिकाऱ्याचा भाऊ हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याचे आले समोर.

जम्मू-काश्मीरमधील अनेक तरुणांचे दहशतवादी संघटनांमध्ये सामिल होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तरुणच नाही तर देशासाठी लढणारे जवान देखील या दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. जम्मू-काश्मीरमधील एका आयपीएस अधिकाऱ्याचा भाऊ दहशतवादी बनला आहे. शमसुल हक मेंगनू असे त्याचे नाव आहे. शमसुल २२ मे रोजी शोपियां येथून गायब झाला होता. तो दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी झाल्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र रविवारी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने शमसुलचा फोटो जारी केला आहे. या फोटोमध्ये शमसुल हातामध्ये रायफल घेऊन उभा आहे.

भाऊ बनला दहशतवादी

काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील २०१२ चे आयपीएस अधिकारी इनाम उल हक मेंगनू यांचा भाऊ शमसुल हक मेंगनू गायब झाला होता. . श्रीनगर वि्दयापीठातून तो २२ मेपासून गायब झाला होता. शमसुल शोपियन येथील द्रुगुड गावामध्ये राहत होता. श्रीनगर विद्यापीठात तो उनानी मेडिसिनचा अभ्यासक्रम शिकत होता. तो गायब झाल्यापासून जम्मू-काश्मीर पोलीस आणि त्याच्या कुटुंबियांकडून त्याचा शोध सुरु होता. आता तो हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

हिजबुलच्या नव्या साथीदारांची यादी जाहीर

हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने रविवारी बुऱ्हाण वाणीच्या मृत्यू दिनानिमित्त आपल्या नव्या साथीदारांची यादी आणि फोटो जाहीर केले. या यादीमध्ये शमसुलचे नाव आणि फोटो समोर आला. सध्या शमसुलचा फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहे. ज्यामध्ये शमसुल एके-४७ रायफल दाखवताना दिसत आहे. एक भाव देशसेवा करतोय आणि दुसरा भाऊ दहशतवादी बनल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

काश्मीरमधील अनेक तरुण दहशतवादी बनले

मागच्या रविवारीच काश्मीरच्या डोडा येथून एक तरुण गायब झाला होता. आबिद भट असं या तरुणाचे ना असून तो देखील हिजबुल या दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी झाल्याची सशय व्यक्त केला जात होता. आबिद देखील दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी झाल्याची माहिती पोलिसांना सोशल मीडियावरुनच मिळाली होती. त्याआधी एप्रिलमध्ये शोपियामधून एक पोलीस गायब झाला होता. हा पोलीस देखील हिजबुल या दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी झाल्याचा दावा या संघटनेने केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -