घरटेक-वेक'या' कंपनीचा ड्युअल स्क्रीन लॅपटॉप लाँच

‘या’ कंपनीचा ड्युअल स्क्रीन लॅपटॉप लाँच

Subscribe

आसूसचा झेनबुक प्रो ड्युओ हा जगातील पहिला दोन स्क्रीन असणारा लॅपटॉप असून याची किंमत २ लाख ९ हजार ९९० रुपये एवढी आहे.

तैवानची कंपनी असलेल्या आसूसचा भारतात ड्युअल स्क्रीन लॅपटॉप लाँच झाला आहे. आसूसने Zenbook Pro Duo (UX581) आणि Zenbook Duo (UX481) भारतीय बाजारपेठेत दाखल केले आहेत. विशेष म्हणजे आसूसचा झेनबुक प्रो ड्युओ हा जगातील पहिला दोन स्क्रीन असणारा लॅपटॉप असून याची किंमत २ लाख ९ हजार ९९० रुपये एवढी आहे. तर Zenbook Duo (UX481) ची किंमत ८९ हजार ९९० रुपयांपासून सुरू होते.

झेनबुक प्रो ड्युओची वैशिष्ट्यं

याआधी झेनबुक प्रो १५ मध्ये स्क्रीनपॅड दाखवण्यात आला होता. मात्र, झेनबुक प्रो ड्युओमध्ये देण्यात आलेली दुसरी स्क्रीन ही प्रो १५ पेक्षा वेगळी आहे. झेनबुक प्रो ड्युओमध्ये देण्यात आलेली दुसरी स्क्रीन ही सलग आहे. तर, स्क्रीनला की बोर्ड एवढी जागा देण्यात आली आहे. की बोर्डच्या वरील बाजूस दुसरी स्क्रीन आहे. ज्याच्यामुळे ही दुसरी स्क्रीन पहिल्या स्क्रीनची विस्तारीत स्क्रीन म्हणून दिसते. Zenbook Pro Duo (UX581) या लॅपटॉपमध्ये १५.६ इंचाची 4K UHD OLED HDR सपोर्टिंग टच स्क्रीन आहे. याच्यासहाय्याने तुम्ही कोणतीही विंडो दुसऱ्या स्क्रीनवरही ड्रॅग करू शकता. मुख्य स्क्रीनवर आसूसने नॅनो एज् डिझाइनचा वापर केला आहे. त्याशिवाय लॅपटॉपमध्ये नंबर पॅड डायल फंक्शनही देण्यात आला आहे. त्याशिवाय ड्युअस स्क्रीन असणाऱ्या लॅपटॉपच्या कीबोर्डमध्ये पाम रेस्ट देण्यात आल्यामुळे टायपिंग करताना अडचण जाणवणार नाही. या लॅपटॉपमध्ये अलेक्सा व्हॉइस सपोर्टदेखील आहे. लॅपटॉपमध्ये ३२ जीबी डीडीआर ४ रॅम आहे. लॅपटॉपमध्ये कोणताही एसडी कार्ड सपोर्ट देण्यात आला नाही. लॅपटॉपचे वजन २.५ किलो आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -