घरमुंबईआदित्यच्या विजयानंतर वरळीत जोरदार जल्लोष

आदित्यच्या विजयानंतर वरळीत जोरदार जल्लोष

Subscribe

अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे विजयी झाले आहेत. आदित्य यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश माने यांचा पराभव केला. त्यामुळे आदित्य यांच्या रूपाने आदित्य हे विधानसभेत जाणारे पहिले ठाकरे असणार आहेत.आदित्य यांच्या विजयानंतर शिवसैनिकांनी जल्लोष सुरू केला होता.

सकाळपासून पहिल्या फेरीतच आदित्य ठाकरे हे आघाडीवर होते. तीच आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायमच राहिली होती. पहिल्या फेरीतच आदित्य ठाकरे यांनी 7 हजार 20मतांची आघाडी घेतली. तेव्हापासून 17 व्या फेरीपर्यंत ते आघाडीवर होते. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास वरळी विधानसभाचे मतदार संघाचे चित्र स्पष्ट झाले. शेवटच्या फेरीअखेर आदित्य ठाकरे यांना 89हजार 248 मते मिळाली आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश माने यांना 21हजार 821 मते मिळाली. आदित्य ठाकरे 67 हजाराहूंन अधिक मताधिक्याने विजयी झाले.

- Advertisement -

विशेष म्हणजे या मतदारसंघात 6500 मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. शिवसेनेचा गड असलेल्या वरळीमधून 2009 ची विधानसभा निवडणूक सोडली तर सातत्याने शिवसेनेचाच उमेदवार निवडून येत आहे. त्यात आता यंदाच्या निवडणुकीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. वरळी विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंविरोधात बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेही निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. मात्र त्यांना फक्त 781 मते मिळाली असून त्यांच्या डिपॉझिट सुध्दा जप्त होणार आहे.

वरळीच्या शिवसेना शाखेत जल्लोष
दुपारी 12 नंतर वरळी नाक्यावरील शिवसेना शाखेत कार्यकर्त्यांची मोठया प्रमाणात गर्दी होती. आदित्य ठाकरे आघाडीवर असल्यापासून कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आदित्य यांच्या विजयाचा जल्लोष केला. दुपारी 3 नंतर आदित्य ठाकरे यांनी वरळीतील शिवसेना शाखेला भेट दिली. त्यानंतर त्यांनी मतमोजणी केंद्राला भेट दिली.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -